पोटच्या मुलीचे सात वर्ष लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बापाला अटक; बारामती शहरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 05:16 PM2020-04-21T17:16:22+5:302020-04-21T17:17:18+5:30
२० वर्षीय तरुणीवर वयाच्या तेराव्या वर्षांपासून हा बाप बलात्कार करीत असल्याचे फिर्यादीत नमूद
बारामती : पोटच्या मुलीचे सात वर्षांपासुन लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात उघड झाला आहे.याप्रकरणी त्या २० वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या नराधम बापाला गजाआड केले आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .त्यानुसार मागील सात वर्षांपासून हा नराधम बाप २० वर्षीय तरुणीवर वयाच्या तेराव्या वर्षांपासून बलात्कार करीत असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमासह विविध कलमाअंतर्गत नुसार गुन्हा दाखल केला आहे. वयाच्या तेराव्या वर्षी १३ डिसेंबर २०१३ मध्ये तिला मासिक पाळी येवुन गेल्यानंतर मुलीला त्रास होत होता.यावेळी तिच्या बापाने तिच्याकडे चौकशी करीत तुला मासिक पाळी मुळे पोटात दुखते आहे .माझ्याकडे एक उपाय आहे,असे सांगत तिच्यावर बलात्कार केला .मुलगी वयाने लहान असल्याने घाबरली .तिच्या बापाने तिला धमकी दिल्याने तिने कोणालाही याबाबत काही सांगितले नाही .याचा फायदा घेत या नराधम बाप आणि संधी साधून घरातच तिच्यावर सतत सात वर्षे शारीरिक अत्याचार केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला बघून घेईल अशी धमकी देत होता.याबाबतचा त्रास असह्य झाल्याने या तरुणीने आपल्या नातेवाईकासह आईला हा घडत असलेला प्रकार सांगितला.त्यानंतर तिच्या बापाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले.त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक शहर औदुंबर पाटील यांनी दिली.
————————————