रक्तरंजित! आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवर बापाचा हल्ला, एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:59 IST2022-07-22T12:58:51+5:302022-07-22T12:59:55+5:30
Attack on wife and daughters : यामध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश होता.

रक्तरंजित! आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवर बापाचा हल्ला, एकीचा मृत्यू
दिल्लीतील करावल नगरमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एकीचा मृत्यू झाला, तर उर्वरितांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १ वाजता पीसीआरला माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या मुलींवर चाकूने हल्ला केला आहे. या कॉलवर दिल्ली पोलिसांची टीम जीटीबी हॉस्पिटलमध्ये पोहोचली, जिथे चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश होता.
चौकशीत दीप सान उर्फ पप्पू याचे गुरुवारी सकाळी 7.15 वाजता पत्नीसोबत भांडण झाल्याचे निष्पन्न झाले. या भांडणात दीपने पत्नीवर चाकूने हल्ला केला. आईला रडताना पाहून घरात उपस्थित असलेल्या मुलींनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधम बापाने मुलींवरही हल्ला केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. उपचारादरम्यान 18 वर्षीय मुलीच्या पोटावर वार करण्यात आले. तिचा मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, 42 वर्षीय आई आणि 21 वर्षीय मुलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.