कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना आरोपीला वडिलांनीच पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:25 IST2019-07-09T19:25:32+5:302019-07-09T19:25:53+5:30
झारखंडमध्ये एका तरुणीबरोबर कारमध्ये कथित बलात्काराची घटना समोर आली आहे.

कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना आरोपीला वडिलांनीच पकडलं अन्...
रांचीः झारखंडमध्ये एका तरुणीबरोबर कारमध्ये कथित बलात्काराची घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांच्या मते, एका नराधमानं मुलीचा बलात्कार केला आणि त्याला त्याच्या मित्रांनी हे दृष्कृत्य करण्यासाठी मदत केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. झारखंडच्या साहिबगंजच्या शाळेत जात असताना सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं पहिल्यांदा अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला स्कॉर्पिओमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
त्या अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. मुलीबरोबर होत असलेल्या बलात्काराची माहिती कोणी तरी तिच्या वडिलांना फोनवरून दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून त्यांनी मुलीला वाचवलं. आरोपींच्या तावडीतून मुलीला सोडवणाऱ्या त्या वडिलांवरही आरोपींनी हल्ला केला.
तिच्या वडिलांना जबर मारहाण केल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यातच जागेवर कोसळले. पोलिसांनी मुलांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तरुणांना तुरुंगातही पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. स्थानिक नेत्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.