धक्कादायक! तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:50 AM2021-07-23T09:50:14+5:302021-07-23T09:55:53+5:30
Crime News : बराच उशीर होऊनही संजय घराबाहेर आला नसल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता, वडील व मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळले.
यवतमाळ - तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगरूळ (ता.यवतमाळ) येथे घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. संजय शिवा उके (30), असे वडिलांचे, तर सहयोग उके (3 वर्षे), असे मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत संजय मागील काही वर्षांपासून चिचघाट (ता.यवतमाळ) येथे सासरी राहात होता. गुरुवारी तो मुलाला घेऊन मंगरूळ येथे आला. मजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता. बराच उशीर होऊनही संजय घराबाहेर आला नसल्याने शेजारच्या लोकांनी उघड्या असलेल्या खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता, वडील व मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. घटनेचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.
भयंकर! भिंतीवर डोकं आपटून तिचा जीव घेतला, मृतदेह गावाबाहेर नेऊन नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला पण...#crime#crimenews#Policehttps://t.co/J2yaM5REv6
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021
धक्कादायक! लग्नाच्या 3 महिन्यांतच पतीचं भयंकर रुप आलं समोर; 3 लाखांचा हुंडा न दिल्याने संतापला अन्...#crime#crimesnews#Police#marriage#Indiahttps://t.co/KqMuwa1oiW
— Lokmat (@MiLOKMAT) July 21, 2021