आईस्क्रीममधून वडिलांनी ३ चिमुकल्यांना दिलं उंदराचं औषध; एकाचा झाला मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:45 PM2021-06-30T14:45:03+5:302021-06-30T14:56:04+5:30
A man gave rat poison to his 3 children : एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन मुले (७ वर्षे व २ वर्षे) यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई हादरून गेली आहे. मानखुर्द येथून हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून यामुळे बाप आणि मुलं यांच्या नात्याला हादरा बसला आहे. वडील आपल्या मुलांसाठी छत्र असतं. मात्र, मुंबईत एका वडिलांनी आपल्या तीन निरापराध चिमुकल्या मुलांना आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळून मारण्याचा प्रयत्न केला. यात एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन मुले (७ वर्षे व २ वर्षे) यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
मुलांच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी आरोपी वडिलांविरूद्ध खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी वडील फरार आहे. मानखुर्द पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक वादामुळे संतप्त वडील मोहम्मद अली यांनी आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळले होते. या घटनेत पाच वर्षीय अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे, तर ७ वर्षीय अलिना आणि २ वर्षीय अरमान यांना गंभीर अवस्थेत मानखुर्द येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत.
A man gave rat poison to his 3 children in ice cream after a family dispute, a 5-year-old child died. Other 2 children (7 yr-old & 2-yr-old) are under treatment. Mankhurd PS registered case under relevant sections of IPC on the complaint of man's wife. Probe is on: Mumbai Police
— ANI (@ANI) June 30, 2021