वडिलांनी मुलीची हत्या करून कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला, नंतर बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 22:48 IST2020-06-03T22:47:34+5:302020-06-03T22:48:49+5:30
ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.

वडिलांनी मुलीची हत्या करून कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला, नंतर बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केल्याची बातमी पसरली तेव्हा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तीन-चार दिवसांपूर्वी आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह कब्रस्तानमध्ये पुरला आणि मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात पसरवली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.
एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न
त्याची सखोल चौकशी केल्यावर आरोपी वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध खुनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. रियाझ अहमद असे आरोपीचे नाव असून तो पूंछ मंडीचा रहिवासी आहे. त्याच्यावर त्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे.
पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्थान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच