आपलं लपडं लपवण्यासाठी बापाने आपल्या लेकीची केली हत्या.. जो घाबरला होता, त्याला दिला दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 07:11 PM2021-09-26T19:11:21+5:302021-09-26T19:12:12+5:30
Murder Case : या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात शुक्रवारी एका निष्पाप मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. झाशी पोलिसांनी हे फक्त एका दिवसात गुन्ह्याची पोलखोल केली आहे. खरंतर, शुक्रवारी झाशीच्या मौरानीपूरच्या धौरा गावात १३ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने कापून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पण झाशीच्या पोलिसांनी या हत्येचं रहस्य फक्त २४ तासात उलगडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपले प्रेमसंबंध आणि इतर काही कारणांमुळे मुलीची हत्या केली होती. एवढेच नाही तर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी कथा रचली.
वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीची दुसऱ्या गावातील लोकांनी हत्या केली आहे. पण त्याची हुशारी पोलिसांपुढे चालली नाही आणि सर्व गुपिते फक्त पोलीस तपासादरम्यान उघड झाली. मौलानीपूर, झाशी येथील धौरा गावात राहणाऱ्या बल्लू प्रजापती या मुलीची शुक्रवारी हत्या करण्यात आली. त्यावेळी ती तिच्या वडिलांसोबत नदीवरून कपडे धुवून घरी परतली होती.
वडिलांनी शेजाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात ही बाब संशयास्पद आढळली, जेव्हा तपास बारकाईने केला गेला तेव्हा वडिलांचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले. गावातील काही लोकांना या प्रेमप्रकरणाची माहिती होती. म्हणूनच वडिलांनी एक योजना बनवली की, मुलीला आधी मारले पाहिजे आणि नंतर त्याच लोकांना तिच्या हत्येत पकडले पाहिजे. या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.