सासऱ्याची रिव्हॉल्व्हर पडल्याने सुनेच्या पायाला लागली गोळी; अंबरनाथमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 22:08 IST2021-10-08T22:07:40+5:302021-10-08T22:08:17+5:30
Crime News: पवार सेक्शन परिसरात राहणारे गजानन पवार यांनी त्यांची रिव्हॉल्व्हर पॅन्टला लावून ती पॅन्ट भिंतीवर अडकवून ठेवली होती.

सासऱ्याची रिव्हॉल्व्हर पडल्याने सुनेच्या पायाला लागली गोळी; अंबरनाथमधील घटना
अंबरनाथ: अंबरनाथच्या चिखलोली पवार सेक्शन परिसरात सासऱ्याची रिव्हॉल्व्हर खाली पडल्याने त्यातून सुटलेली गोळी सुनेच्या पायाला लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. जखमी सुनेला कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पवार सेक्शन परिसरात राहणारे गजानन पवार यांनी त्यांची रिव्हॉल्व्हर पॅन्टला लावून ती पॅन्ट भिंतीवर अडकवून ठेवली होती. अडकवलेली ही पॅन्ट धुण्यासाठी पवार यांच्या सुनबाई अनिता पवार त्यांनी काढले असता त्या पॅंटला लावण्यात आलेली रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्यातून अचानक गोळी सुटून ती थेट अनिता यांच्या पायाला लागली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पवार कुटुंब धास्तावले होते. जखमी अनिता पवार यांना लागलीच कल्याणच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.