घृणास्पद! तांत्रिकाच्या सांगण्यावरून पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा दिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 09:10 PM2020-04-20T21:10:11+5:302020-04-20T21:11:31+5:30
पित्याने रात्री फावड्याने मुलीची गळा कापून तिचा मृतदेह जमिनीत पुरला.
मेरठ - मुजफ्फरनगर येथील ककरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली. वडिलांनी तांत्रिकांच्या सांगण्यावरून अडीच वर्षाच्या मुलीचा बळी दिला. पित्याने रात्री फावड्याने मुलीची गळा कापून तिचा मृतदेह जमिनीत पुरला.
पोलिसांना माहिती मिळताच मृताची आई ककरौली पोलीस ठाण्यात गेली आणि हत्या केलेल्या पित्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वडिलांना व त्याच्या साथीदार तांत्रिकला अटक केली आणि जमिनीत पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. वडिलांचे म्हणणे आहे की, घरात क्लेश उत्पन्न झाला होता आणि मुलगी त्याच्याकडे आली नव्हती, म्हणून त्याने तांत्रिकच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली.
सीओ भोपा राम मोहन शर्मा यांनी सांगितले की, मीरापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील गाव सिकंदरपूर येथील रहिवासी असलेला वाजिदचा मुलगा खुर्शेद, त्याची पत्नी रिहाना आणि ५ मुले यांच्यासह राहत असून ककरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाईखेडा येथे काम करतात. मेरठच्या रसीदनगरमध्ये राहणारा इरफान यांचा मुलगा रफीक हा मजूर असून तो तांत्रिक देखील आहे. रविवारी रात्री वाजिदने आपली अडीच वर्षाची सर्वात लहान मुलगी तरन्नुमची गळा आवळून नंतर तिची मान फावड्याने कापून हत्या केली. यानंतर, मृतदेह जमिनीत पुरला. रात्री उशिरा मुलीच्या हत्येची माहिती मिळताच रिहानाने ककरौली पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना कळविताना तिचा नवरा आणि तिचा साथीदार तांत्रिक इरफान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीओने सांगितले की, ककरौली पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मारेकरी वडील वाजिद व तांत्रिक इरफान यांना अटक केली आणि जमिनीत पुरलेल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. सीओच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान वाजिदने सांगितले की, घरात क्लेशामुळे त्रास झाला आहे आणि सर्वात लहान मुलगी तरन्नुम त्याच्याकडे नव्हती. याबद्दल सांगितले असता तांत्रिक इरफानने सांगितले की, असे केल्यास सर्व ठीक होईल. त्याच्या सांगण्यावरून खुर्शेदने ही घटना घडवून आणली. सीओ भोपा म्हणाले की, दोघांची चौकशी केली जात आहे.