6 लेकरांच्या वडिलांनी ट्रांसजेंडरसोबत केलं लग्न, पत्नीला तीन तलाक देऊन काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 12:11 PM2023-03-07T12:11:44+5:302023-03-07T12:12:09+5:30

Crime News : महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तिची लग्न 32 वर्षाआधी झालं होतं आणि आता तिला 6 मुलं आहेत. ज्यातील 4 मुली आणि 2 मुलं आहेत.

Father of 6 married a transgender, divorced his wife three times | 6 लेकरांच्या वडिलांनी ट्रांसजेंडरसोबत केलं लग्न, पत्नीला तीन तलाक देऊन काढलं बाहेर

6 लेकरांच्या वडिलांनी ट्रांसजेंडरसोबत केलं लग्न, पत्नीला तीन तलाक देऊन काढलं बाहेर

googlenewsNext

Crime News : राजधानी दिल्लीच्या भजनपूरा भागात महिलेला ट्रिपल तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. भजनपूरा पोलीस स्टेशनमध्ये महिलेने आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस छापे मारत आहे.

पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिला भजनपूरा भागात राहणारी आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तिची लग्न 32 वर्षाआधी झालं होतं आणि आता तिला 6 मुलं आहेत. ज्यातील 4 मुली आणि 2 मुलं आहेत.

महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला सोडलं आणि एका ट्रांसजेंडरसोबत लग्न केलं. असं सांगितलं जात आहे की, सामाजिक दबावामुळे त्याने ट्रांसजेंडरलाही सोडलं आणि एका दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. या लग्नापासूनच पती तिच्यावर घर खाली करण्यासाठी दबाव टाकत होता आणि तसेच घर खाली केलं नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकीही देत होता. आरोप आहे की, तिच्या पतीने 7 जुलै 2022 तिला तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून घरातून जाण्यास सांगितलं होतं.

पीडित महिलेने सांगितलं की, तिचा पती तिला त्रास देतो आणि मुलांच्या संगोपणासाठी पैसेही देत नाही. तर तिला पती म्हणाला की, पत्नीने लावलेले सगळे आरोप खोटे आहेत.

आरोपीनुसार, त्याची पत्नी हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत आहे. घर तिच्या नावावर करण्यासाठी ती दबाव टाकत आहे. तो म्हणाला की, मी पत्नीला तलाक दिला नाही आणि तिला कोणता त्रासही दिला नाही. 

Web Title: Father of 6 married a transgender, divorced his wife three times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.