दूध कमी आणले म्हणून वडिलांनी मुलावर झाडली गोळी अन् स्वतः केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:55 PM2020-04-07T17:55:50+5:302020-04-07T17:58:33+5:30
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वडिलांचा आणि मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.
उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यात वडील आणि मुलात कमी दूध आणल्यावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की वडिलांनी आपला समतोल गमावला आणि मुलावर गोळी झाडली. दोघांच्या भांडणात वाचवण्यास मध्ये आलेल्या भावाला देखील वडिलांनी गोळी घातली. नंतर त्याने स्वत: लाही गोळी घालून आत्महत्या केली. जखमी भावावर उपचार सुरू आहे. तर वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वडिलांचा आणि मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील पूरनपूर कोतवालीच्या घुंघचिआई चौकी अंतर्गत असलेल्या सोहन्ना येथील आहे. असे म्हटले जाते की, सरदार गुरमुख सिंह यांचा मुलगा शंकर सिंग यांचा सोमवारी संध्याकाळी उशीरा त्यांच्या मुलाशी वाद झाला. विवाद हा मुलाला फक्त पिण्यायोग्य दूध आणण्यासाठी सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, लोक भावासोबतच्या झालेल्या भांडणात गोळीबार झाल्याबद्दल बोलत आहेत. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध आणण्यावरून झालेल्या वादात गोळीबार करण्यात आला.
असा दावा केला जात आहे की, गुरमुख सिंह यांचा मुलगा गुरमुुुख यांच्यासाठी पिण्यालायक दूध घेऊन आला. यावरून वडील व मुलामध्ये वाद झाला. वडील आणि मुलामधील वाद इतका वाढला की, गुरुमुख सिंग यांनी आपली परवानाधारक बंदूक बाहेर काढली. ते पाहून गुरमुखचा भाऊ अवतार सिंह यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. गुरुमुखने भाऊ अवतार आणि दुसऱ्या मुलावर गोळी झाडली. या गोळीबारात अवतारच्या पायाला गोळी लागून जखमी झाला. यानंतर गुरमुखने स्वतःवर देखील गोळी झाडली. गुरमुख आणि मुलगा जसकरन यांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पूरनपूर कोतवालीच्या पोलिसांनी सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) उपचार घेण्यासाठी जखमी अवतारला दाखल केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहित मिश्रा म्हणाले की, दुधाबाबत दोन्ही भावांमध्ये भांडण झाले. भांडणात गुरमुखने त्याच्या परवानाधारक रायफलमधून गोळीबार केला आणि स्वत: ला गोळी झाडली.