खळबळजनक! सासऱ्याने लव्ह मॅरेज करून आलेल्या सूनेला ८० हजार रूपयात विकलं, असा झाला भांडाफोड....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:31 PM2021-06-07T17:31:39+5:302021-06-07T17:34:34+5:30
इथे एका सासऱ्याने त्याच्या सूनेला ८० हजार रूपयात विकले. जेव्हा याची माहिती महिलेच्या पतीला लागली तर तो हैराण झाला.
लखनौच्या बाराबंकीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्या सासऱ्यांना सूने वडिलांचा दर्जा दिला त्याच व्यक्तीने आपल्या मुलीसारख्या सूनेला पैशांसाठी विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका सासऱ्याने त्याच्या सूनेला ८० हजार रूपयात विकले. जेव्हा याची माहिती महिलेच्या पतीला लागली तर तो हैराण झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
ही घटना बाराबंकीच्या मल्लापूर गावातील आहे. इथे राहणाऱ्या चंद्रराम वर्माचा मुलगा प्रिन्सचं लग्न२०१९ मध्ये आसाममध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत झालं होतं. प्रिन्सने प्रेमविवाह केला होता. तो ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून तरूणीला भेटला होता. लग्नानंतर दोघेही आनंदाने संसार करत होते. प्रिन्स आपल्या पत्नीसोबत गाझियाबादला गेला आणि दोघे तिथेच राहत होते. इथे तो टॅक्सी चालवण्याचं काम करत होता. (हे पण वाचा : धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप)
इकडे पैशांच्या हव्यासापोटी सासरे चंद्ररामने प्रिन्सच्या पत्नीला ८० हजार रूपयात विकण्याचा प्लॅन केला. त्याने प्रिन्सच्या पत्नीला ४ जूनला घरी बोलवलं आणि रामू गौतमने गुजरातहून साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांना बाराबंकीला बोलवलं. ज्यानंतर पूर्ण बोलणी झाली.
प्रिन्सला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याला धक्का बसला आणि तो पाच जूनला घरी परत आला. घरी ना पत्नी होती ना त्याच्या वडिलांचा काही पत्ता होता. त्यानंतर त्याने वडिलांविरोधात पोलिसात लिखित तक्रार दाखल केली. (हे पण वाचा : धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या, कारण...)
एसपी अवधेश सिंह यांच्या आदेशावरून महिला अधिकारी शकुंतला उपाध्याय यांनी पोलिसांची एक टीम तयार केली आणि त्यांनी महिलेला म्हणजे प्रिन्सच्या पत्नीला रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतलं. तसेच लग्न करण्यासाठी आलेल्या तरूणासह आठ लोकांना अटक केली.
महिलेला तिच्या सासऱ्यांनी हे सांगून आरोपीसोबत पाठवलं होतं की, ते तिला गाझियाबादला प्रिन्सकडे सोडतील. एसपी अवधेश सिंह म्हणाले की, हे प्रकरण मानवी तस्करीचं आहे. याप्रकरणी फरार चंद्रराम आणि रामू गौतम यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.