धक्कादायक! किरकोळ वादातून बाप-मुलावर चाकूने वार; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 13, 2022 04:22 PM2022-10-13T16:22:22+5:302022-10-13T16:22:39+5:30

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास तुर्भे स्टोअर येथे हा प्रकार घडला आहे.

Father-son stabbed over dispute in Navi Mumbai; A case has been registered against the attackers | धक्कादायक! किरकोळ वादातून बाप-मुलावर चाकूने वार; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

धक्कादायक! किरकोळ वादातून बाप-मुलावर चाकूने वार; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

नवी मुंबई : किरकोळ वादातून पिता पुत्रावर हल्ला झाल्याची घटना तुर्भे स्टोअर येथे घडली आहे. मुलाला मारहाण होत असताना त्याला वाचवण्यासाठी वडील धावले असता त्यांच्यावरही वार करण्यात आले. याप्रकरणी एकावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास तुर्भे स्टोअर येथे हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या मछिंद्र याला त्याच परिसरातला मरगुनाथ चौगुले मारहाण करत होता. यावेळी मुलाला मारहाण होत असल्याचे समजताच वडील खंडू जगताप हे त्याठिकाणी धावून गेले. त्यांनी मारहाण करणाऱ्या चौगुले याला जाब विचारला असता त्याने खंडू यांच्यावर देखील चाकूने वार केले. तसेच झालेल्या मारहाणीची पोलिसांकडे तक्रार केल्यास पुन्हा बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर दोघेही पिता पुत्र रुग्णालयात दाखल झाले असता गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार मरगुनाथ चौगले विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Father-son stabbed over dispute in Navi Mumbai; A case has been registered against the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.