नात्याला काळीमा! पोटच्या पोरीवर बापाची वाईट नजर; मुलीनं विरोध केल्यावर तिचे केस कापले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:56 AM2021-04-21T09:56:47+5:302021-04-21T09:58:26+5:30
हे प्रकरण मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी २० वर्षाच्या मुलीने बापावर आरोप केलाय
मेरठ – उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एक बाप स्वत:च्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत होता आणि वारंवार तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत होता. ज्यावेळी मुलीने याचा विरोध करण्यास सुरूवात केली तेव्हा बाप मुलीला बेदम मारहाण करत आणि घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करायचा. त्यानंतर या बापाने कहरच केला. आरोपी बापाने मुलीचे केस कापून तिला टकलं केलं.
हे प्रकरण मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी २० वर्षाच्या मुलीने बापावर आरोप केलाय की, आरोपी वडील दारूच्या नशेत तिच्यासोबत अश्लील बोलत होता. तसेच वाईट नजरेचे तो पाहायचा. अनेकदा बापाने तिच्यासोबत चुकीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना यात यश आलं नाही तेव्हा रागाच्या भरात त्याने कैची घेऊन मुलीचे केस कापले आणि वस्तऱ्याने तिला टकलं केले.
घडलेला प्रकार पीडिताने ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना सांगितला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बापाला अटक केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पीडिताने तक्रारीत म्हटलंय की, जेव्हा तिची आई नमाज पठण करण्यासाठी बसत होती तेव्हा बाप दारूच्या नशेत तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करत होता. या प्रकारावरून अनेकदा घरात भांडणं झाली. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर सुरुवातीला याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही.
पीडित मुलीचा आरोप आहे की, मागील ३ वर्षापासून तिचा बाप तिच्यासोबत अशाप्रकारे घाणेरडे कृत्य करत आहे. घराची इज्जत राखण्यासाठी मुलीने आजपर्यंत हे बाहेर सांगितलं नाही. परंतु यावेळी जेव्हा आई नमाज पठण करत होती तेव्हा आरोपी बाप मुलीच्या खोलीत घुसला आणि तिच्यासोबत लैंगिक चाळे करू लागला. जेव्हा मुलीने त्याचा विरोध करत ओरडण्यास सुरूवात केली तेव्हा बापाने कैचीने तिचे केस कापले आणि वस्तऱ्याने तिला टकलं केले.
या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. जे काही सत्य असेल त्याच्या आधारे पोलीस कारवाई करेल असं आश्वासन पोलीस अधिकारी अरविंद चौरसिया यांनी दिलं आहे.