पोटच्या मुलीला देहविक्रयच्या बाजारात सौदा करणाऱ्या बापाला  सश्रम कारवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 10:55 PM2022-01-17T22:55:58+5:302022-01-17T22:56:07+5:30

जिल्हा न्यायालय: चौदा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात ठोठावली शिक्षा

A father who sells his daughter in the prostitution market has been sentenced to life imprisonment | पोटच्या मुलीला देहविक्रयच्या बाजारात सौदा करणाऱ्या बापाला  सश्रम कारवास

पोटच्या मुलीला देहविक्रयच्या बाजारात सौदा करणाऱ्या बापाला  सश्रम कारवास

Next

नाशिक : पंचवटी परिसरातील पेठरोड भागात राहणाऱ्या एका बापाने सुमारे चौदा वर्षापूर्वी आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा देहविक्रयच्या बाजरात सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.17) झालेल्या अंतिम सुनावणीत आरोपी बापाला दहा वर्षांची सक्तमजुरी व एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.

पेठरोड भागातील फुलेनगर परिसरात राहणारा आरोपी दत्तात्रय उर्फ दत्तू चव्हाण (४५) याने पीडित अल्पवयीन मुलीचा पुण्यात वेश्या व्यवसायासाठी सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलीस ठाण्यात दत्तू याने स्वतः फिर्यादी होऊन मुलीचा देहविक्रयसाठी नेण्यात आल्याची फिर्याद दिली होती. पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक धनराज दायमा यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता पीडितेने दिलेल्या जबाबावरून फिर्यादी आरोपी चव्हाण हाच म्होरक्या असल्याचे समोर आले. दायमा यांनी त्यास बेड्या ठोकल्या व त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७२ व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये 21 मार्च 2007 साली गुन्हा दाखल केला.  गुन्ह्याचा तपास करत सबळ  परिस्थितीजन्य पुरावे न्यायालायपूढे सादर केले. या खटल्याला 2008साली सुरुवात झाली. जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी न्यायाधीश व्ही एस कुलकर्णी यांनी   साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार दायमा यांनी सादर केलेल्या पुरव्यांच्याआधारे आरोपी दत्तू चव्हाण यास दोषी धरले. सरकारी पक्षाकडून अभियोक्ता भानुप्रिया नितीन पेटकर यांनी कामकाज पाहिले.पीडिता अंतिम सुनावणीत साक्ष देण्यासाठी गैरहजर राहिली. गुन्ह्यातील इतर दोन्ही संशयित महिलांविरुद्ध सबळ पुरावे समोर न आल्याने न्यायालयाने त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

Web Title: A father who sells his daughter in the prostitution market has been sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.