नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त
By स्नेहा मोरे | Published: August 12, 2022 03:53 PM2022-08-12T15:53:58+5:302022-08-12T15:54:29+5:30
Nashik News: नाशिक येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत 1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला.
- स्नेहा मोरे
मुंबई - नाशिक जिल्ह्यातील शिंदे गाव येथे अन्नसुरक्षा अधिकारी, श्री गोपाल कासार यांनी विशेष मोहिम अंतर्गत अमित रासकर अविनाश दाभाडे अन्नसुरक्षा अधिकारी यांचे समवेत मेसर्स मे माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड नायगाव रोड शिंदे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत 1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला. ही कारवाई लेबल दोष व ब्राह्मक जाहिरात असल्याच्या कारणावरून तसेच अन्न पदार्थ अप्रमाणित असल्याच्या संशयावरून करण्यात आली. कारवाई सह आयुक्त, नाशिक विभाग गणेश परळीकर साहेब व सहाय्यक आयुक्त( अन्न) परिमंडळ 4 श्री विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.