चोरीच्या भीतीने आई वडिलांनी मुलांच्या पायात साखळी बांधून लावले कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:47 PM2021-07-07T21:47:55+5:302021-07-07T21:49:00+5:30
Crime News : या चोरीच्या भीतीने पालकांनी मुलांचे हात पाय साखळीने बांधून कुलूप लावून घेतले आहेत.
अलिगड - उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातील ठाणे कुर्शी परिसरातील ठाणे महुआ खेडा परिसरातील सरोज नगरमध्ये आई-वडिलांनी मुलांचे हात पाय साखळ्यांनी बांधून त्यांना कुलूप लावले. २ आठवड्यांपूर्वी एका लहान मुलीची चोरी झाली होती. या चोरीच्या भीतीने पालकांनी मुलांचे हात पाय साखळीने बांधून कुलूप लावून घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माहुआ खेडा पोलिस ठाण्याच्या सरोज नगरात रस्त्यावर झोपडी बांधून काही लोहार कुटुंबे राहत आहेत. लोहार कुटुंबे गरिबीमुळे रस्त्याच्या कडेला राहतात आणि कुटुंबासमवेत ते त्यांच्या मुलांसाठी जगतात.
२२ जून रोजी एक २ वर्षाची मुलगी खाटेवर झोपली होती. त्याच वेळी पहाटे ४ वाजता अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या मुलीला झोपडपट्टीतून उचलले व तिला आपल्याबरोबर घेऊन गेले. सकाळी नातेवाईकांना झोपेतून जाग आली तेव्हा मुलं तेथे नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. जेव्हा मुलीचा पत्ता लागला नाही, तेव्हा घरातील सदस्यांनी पोलिस स्टेशन महुआ खेडा यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात मुलीचा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नोंदवूनही पोलिस हरवलेल्या २ वर्षाच्या मुलीचा शोध घेऊ शकले नाहीत.
हरवलेल्या मुलीच्या कित्येक दिवसानंतरही पोलिसांना शोध लागला नाही. नंतर आजूबाजूच्या पालकांना आपल्या मुलांच्या चोरीची भीती सतावू लागली. त्यानंतर पालक चोरीच्या भीतीने आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यास जागरूक झाले. कुटुंबातील सदस्यांनी मुलांचे हात व पायात लोखंडी साखळ्यांनी बांधले आणि कुलूप लावले आणि त्या खाटांवर झोपायला लावले. जेणेकरून कोणीही त्यांच्या मुलांना उचलून घेऊन जाऊ शकणार नाही.