फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 06:21 PM2020-09-21T18:21:45+5:302020-09-21T18:28:14+5:30

वर्ष उलटले तरी राष्ट्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल नाही

Felix Dahal murder case still pending with CBI, expresses sarrow from mother | फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

Next
ठळक मुद्देया प्रकरणी दिल्लीतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी जी चाचणी घेतली होती त्याचा अहवाल मागचे वर्षभर आलेला नसून त्यामुळे सगळा तपासच ठप्प झाला आहे.सदर तपास रेंगाळत असल्याने फेलिक्सची आई फिरनोन हिने चिंता व्यक्त केली आहे.

मडगाव - गोव्यातील तपास यंत्रणांच्या हाताबाहेरची गोष्ट म्हणून स्वीडिश युवक फेलिक्स दहाल याच्या कथित खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून वर्ष उलटले तरी अजूनही हा तपास रखडलेल्या अवस्थेतच आहे. या प्रकरणी दिल्लीतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी जी चाचणी घेतली होती त्याचा अहवाल मागचे वर्षभर आलेला नसून त्यामुळे सगळा तपासच ठप्प झाला आहे.


फेलिक्स दहाल या स्वीडिश युवकाचा मृतदेह पाटणे काणकोण येथे 28 जानेवारी 2015 या दिवशी पहाटेच्या दरम्यान आढळून आला होता. उंचावरून आपटल्याने त्याला मृत्यू आला असावा असा तर्क त्यावेळी काणकोण पोलिसांनी व्यक्त केला. ड्रग ओव्हरडोसमुळे आलेला मृत्यू असा निष्कर्ष काढून ह्या  प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली होती. मात्र फेलिक्सची आई मीना फिरनोन हिने हा दावा अमान्य करताना आपल्या मुलाचा त्याच्या मित्रांनी पैशांच्या कारणावरून खून केला असा दावा करून गोवा पोलीस या प्रकरणाचा योग्य रितीने तपास करत नसल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हे प्रकरण सीबीआयकडे तपासास देणे भाग पाडले होते.

फेलिक्स ऑक्टोबर 2014 मध्ये गोव्यात आला होता. मारणापूर्वी त्याला पाटणे येथे एका रेस्टॉरंटमध्ये शेवटचे पाहिले होते. या रेस्टॉरंटपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर खडबडीत रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला होता. सीबीआयने हा तपास सुरू केल्यानंतर मागच्या वर्षी जून महिन्यात घटना स्थळावर जाऊन पुन्हा एकदा क्राईम सिन तयार करताना दिल्ली येथील न्यायवैद्यक  प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून फेलिक्सला मृत्यू कसा आला असावा याची तपासणी केली होती. हा मृत्यू अपघात की घातपाताचा प्रकार हे न्यायवैद्यक यंत्रणेने ठरवावे अशी मागणी केली होती. मात्र एक वर्ष उलटले तरी या यंत्रणेने हा अहवाल दिलेला नाही.


सदर तपास रेंगाळत असल्याने फेलिक्सची आई फिरनोन हिने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयने न्यायवैद्यक यंत्रणेला हा अहवाल त्वरित पाठवावा यासाठी स्मरणपत्र पाठविले आहे. सीबीआयला हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा दावा मान्य नसून कुणीतरी त्याला मारहाण केल्यामुळेच हा मृत्यू झाला असा त्यांचा संशय आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात


सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

Web Title: Felix Dahal murder case still pending with CBI, expresses sarrow from mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.