जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महिला अधिकाऱ्याने मागितली लाच अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 05:45 PM2020-03-12T17:45:42+5:302020-03-12T17:48:55+5:30

याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Female officer asks for bribe to give caste validation certificate and ...pda | जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महिला अधिकाऱ्याने मागितली लाच अन्...

जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महिला अधिकाऱ्याने मागितली लाच अन्...

Next
ठळक मुद्दे एस. ए. गोवेकर (४५) आणि कामाठी म्हणून काम करणाऱ्या अमित मोरे (३८) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आज सकाळी ११ वाजता सापळा रचून अटक केली आहे. गोवेकर यांनी स्वतः तक्रारदाराकडे तडजोडअंती ९० हजार लाचेची मागणी केली.

ठाणे - वर्तकनगर येथील कोकण विभागात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एस. ए. गोवेकर (४५) आणि कामाठी म्हणून काम करणाऱ्या अमित मोरे (३८) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आज सकाळी ११ वाजता सापळा रचून अटक केली आहे. 


तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता गोवेकर यांनी स्वतः तक्रारदाराकडे तडजोडअंती ९० हजार लाचेची मागणी केली. लाच देण्यास नकार असल्याने याबाबत एसीबीकडे तक्रारदाराने तक्रार केली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचून गोवेकर आणि मोरेला अटक केली. याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात

 

नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

 

शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

एक लाखाची लाच स्वीकारताना खाजगी दलालासह नायब तहसीलदारास रंगेहाथ पकडले

Web Title: Female officer asks for bribe to give caste validation certificate and ...pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.