'मी तुमच्या मुलीसारखी...'; महिला SI चा पोलीस निरीक्षकावर छेडछाडीचा आरोप, चॅट व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:47 PM2023-03-15T15:47:26+5:302023-03-15T15:48:41+5:30
यासंदर्भात संबंधित महिला सब-इन्स्पेक्टरने नोएडाच्या महिला सुरक्षा डीसीपींना पत्र लिहिले असून, संबंधित इन्स्पेक्टरवर जाणूनबुजून बॉड टच केल्याचा तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला उपनिरीक्षकाने येथील निरीक्षक विनोद कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात संबंधित महिला सब-इन्स्पेक्टरने नोएडाच्या महिला सुरक्षा डीसीपींना पत्र लिहिले असून, संबंधित इन्स्पेक्टरवर जाणूनबुजून बॉड टच केल्याचा तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. बॅड टच करण्याबरोबरच व्हॉट्सअॅपवर मॅसेज करत छेडछाड करण्याचा आरोप केला आहे.
नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात तैनात महिला उपनिरीक्षकाने त्यांच्या तक्रारीत लिहिले आहे, 'पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार हे मला मानसिक त्रास देत आहेत. होलिका दहन म्हणजेच 7 मार्च ला माझी ड्यूटी ग्रँड ओमेक्स सोसायटीमध्ये होती. मात्र, प्रभारी निरीक्षकांनी मला त्यांच्यासोबत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी रंग लावण्याच्या बहाण्याने मला बॅड टच केले.'
एवढेच नाही तर, "जेव्हा इंस्पेक्टरने मला बॅड टच केले, तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, सर आपण आपल्या मर्यादेत रहायला हवे, एसएचओ आहात तर आपण आपल्या पदाची गरिमा राखायला हवी. मी तुमच्या मुलीसारखी आहे, हे आपल्याला समजायला हवे. मात्र यानंतरही त्यांना समजले नाही आणि ते व्हॉट्सअॅपवर मेसेज करू लागले," असेही संबंधित महिला इन्स्पॅक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याच बरोबर, पोलीस ठाण्याचे प्रभारी इन्स्पॅक्टर यांचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल होत आहे. हे प्रकरण नोएडाच्या पुलिस कमिश्नर लक्ष्मी सिंह यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच चौकशीसाठी विशाखा गाइडलाइन अंतर्गत तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.