शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर केला रेप, चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवून घेतला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:43 AM2023-01-26T11:43:49+5:302023-01-26T11:44:16+5:30
Teacher Raped Student : मिसौरीमध्ये 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला आपल्याच विद्यार्थ्यावर रेप केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं.
Teacher Raped Student : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं फार खास अससतं. असे अनेक शिक्षक असतात जे आपल्या शिष्यांना पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण अमेरिकेतील एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत फारच धक्कादायक कृत्य केलं. आपली कामेच्छा भागवण्यासाठी तिने विद्यार्थ्यावर रेप केला. तिने त्याला चांगले नंबर देण्याचं आमिष दाखवलं होतं.
मिसौरीमध्ये 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला आपल्याच विद्यार्थ्यावर रेप केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. विद्यार्थ्याने दावा केला की, त्याला भीती होती की, जर त्याने शिक्षिकेचं ऐकलं नाही तर ती त्याला फेल करेल. त्यामुळे त्याने तिचं ऐकलं.
दोनदा घेतला त्याचा फायदा
विद्यार्थी केवळ 16 वर्षांचा होता आणि येथील कायद्यानुसार, तो एक अल्पवयीन होता. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की, अभ्यासादरम्यान शिक्षिका त्याच्यावर खूप लक्ष देत होती. त्याची फार काळजी घेत होती. दोघांची पहिली भेट एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरी झाली होती. त्यानंतर ती त्याला दोनदा भेटली आणि त्याच्यासोबत संबंध ठेवले. दोन्ही वेळा ती तिच्या कारने आली आणि त्याला सोबत घेऊन गेली.
पहिल्या भेटीवेळी शिक्षिकेने विद्यार्थ्याला किसं केलं आणि त्याला कपडे काढण्यास सांगितलं. हे ऐकून त्याला धक्का बसला. तो घाबरलेला होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो तिला म्हणाला की, त्याला हे बरोबर वाटत नाहीये. त्याला घरी जायचं आहे. पण तिने ऐकलं नाही. दुसऱ्या वेळी त्यांनी किस केलं, कपडे काढले आणि संबंध ठेवले.
स्कूल प्रशासनाला हे जेव्हा समजलं तेव्हा शिक्षिकेला सुट्टीवर पाठवलं. प्रशासनने सांगितलं की, आम्ही गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपाकडे फार गंभीरतेने बघतो. त्यामुळे जेव्हा डिसेंबरमध्ये हा आरोप लावण्यात आला तेव्हाच तिला सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं. आम्ही चौकशीत मदत करत आहोत आणि योग्य ती कारवाई केली जाईल.