पिंपरीत महिला चोरटयांचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:55 PM2019-08-21T14:55:53+5:302019-08-21T16:32:52+5:30
पीएमपी बस प्रवासात महिलांचे टोळके बॅगा पळविणे, पाकीटमार महिलांचे ग्रहण लागले आहे..
शीतल मुंढे-
पिंपरी : वेळ साधारण अकराची बसमधून रडण्याचा मोठा आवाज, माझ्या पिशवीतील पैसे कुठे गेले... मी आता काय करू... नातीच्या लग्नासाठी नातेवाइकांकडून उसणे घेतलेले हे पैसे होते...पैसे कोणीतरी चोरले. असा महिलेचा आरडा ओरडा सुरू होता. पुण्याहून निगडीकडे निघालेली बस कासारवाडी ते नाशिक फाटा येथे आली असता, ६० ते ६५ वर्षांच्या आजी जोर-जोरात रडत होत्या. चोरट्यांचे टोळके बसमध्ये सक्रिय असल्याने सोमवारी एका आजीबार्इंना कटू अनुभव आला.
पीएमपी बस प्रवासात महिलांचे टोळके बॅगा पळविणे, पाकीटमार महिलांचे ग्रहण लागले आहे. बहुतांश बसमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीड वर्षांपासून बसमध्ये चोरट्याची सक्रिय आहे. दिवसात पंचवीस ते तीस घटना घडत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरी करीत असून सकाळी व संध्याकाळी चोरीचे प्रमाण अधिक आहे. दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवडगाव, निगडी, डांगे चौक, काळेवाडी फाटा, पिंपळे गुरव, हिंजवडी, वाकड या मार्गावर चोरीचे प्रकार घडतात.
महिलांची सहा ते सात जणांची टोळी आहे. प्रत्येक महिलेच्या कडेवर मूल असते. त्या सर्वजण एकाच ठिकाणी घोळका करतात, चोरीसाठी सावज हेरतात. अजूबाजूला घोळका करून हातचलाखीने त्या महिला दागिने अथवा रोकड, किमती वस्तू काही क्षणात लंपास करतात. बसमधून उतरून लगेचच दुसरी बस पकडतात. चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात येण्याआगोदर महिला बसमधून उतरून निघून गेलेल्या असतात.
.......
ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असतानाही चोऱ्या होत आहेत. फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटू शकते. मात्र प्रशासनामध्ये उदासीनता दिसून येत आहे.
४ काही प्रवासी पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी जातात; पण त्यांना पोलीस विचारतात की, हा नेमका प्रकार कुठे झाला आहे. प्रवाशाने एखादे ठिकाण सांगितले तर ते आमच्या हद्दीत नाही. तुम्ही त्या पोलीस चौकीत जा.असे सांगितल्यामुळे प्रवासी शक्यतो पोलीस स्टेशनला जाण्यास टाळाटाळ करतात.
........
पीएमपी बसमधील चोरींच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. आम्ही त्याबाबत वाहकाला आणि चालकाला तशा सूचना केल्या आहेत. चोरी करताना दिसल्यास प्रवाशांना सावध करणे आवश्यक आहे. मात्र गर्दीत चोरट्यांना ओळखणे अवघड असते. नवीन बसमध्ये सीसीटीव्ही कॅमरे आहेत. त्यामुळे अशा चोºयांवर नियंत्रण आणता येईल.