कुंपण शेत खातंय! पोलिसाला लाच घेताना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 05:59 PM2019-11-01T17:59:51+5:302019-11-01T18:46:31+5:30
लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सोनावणे याला एसीबीने रंगेहाथ अटक केली.
नालासोपारा - नालासोपारा पोलीस ठाण्याचे लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सोनावणे (४१) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबीने) अटक केली आहे. तक्रारदार यांच्यावर चॅपटर केस न करण्यासाठी १ लाख ४० हजार रुपये लाचेची मागणी सोनावणे यांनी केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम ५० हजार इतकी ठरली. ५० हजार लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सोनावणे याला एसीबीने रंगेहाथ अटक केली.
नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या धर्मेंद्र सोनावणे यांनी ३८ वर्षीय तक्रारदार यांच्याकडे काल सोनावणे यांनी चॅपटर केस न करण्यासाठी १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोड करून ५० हजार लाचेची रक्कम ठरली. तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने याबाबत एसीबीला माहिती दिली. त्यानंतर आज एसीबीने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
नालासोपारा - लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सोनावणे यांना एसीबीने केली अटक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 1, 2019