Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:08 PM2021-08-03T13:08:06+5:302021-08-03T13:09:25+5:30

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, डॅन आणि डेविना डिक्सनने अपत्यप्राप्तीसाठी कॅनडामध्ये फ्रटिलिटी डॉक्टर नॉर्मन बारविनची मदत घेतली होती.

Fertility doctor exposed, he secretly impregnate 17 women with his own sperm | Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....

Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....

googlenewsNext

कॅनडातील एका फर्टिलिटी डॉक्टरवर अनेक महिलांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलांचा आरोप आहे की डॉक्टरने स्पर्म  बदलून आपल्या स्पर्मने त्यांना प्रग्नेंट केलं. म्हणजे डॉक्टरने न सांगता महिलांच्या एग्सना आपल्या स्पर्मने फर्टिलाइज करून त्यांना प्रग्नेन्ट केलं. याप्रकरणी डॉक्टरला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, डॅन आणि डेविना डिक्सनने अपत्यप्राप्तीसाठी कॅनडामध्ये फ्रटिलिटी डॉक्टर नॉर्मन बारविनची मदत घेतली होती. यानंतर डेविनाने १९९० मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्यांनी तिचं नाव रेबेका ठेवलं. दोन दशकांपेक्षा अधिकचा काळ डिक्सन परिवाराला वाटत होतं की, रेबेकाचा जैविक पिता डॅन हाच आहे. पण अलिकडे करण्यात आलेल्या एका डीएनए टेस्टमधून समोर आलं की, रेबेका मुळात ही फर्टिलिटी डॉक्टरची मुलगी होती. 

हा सगळा प्रकार डॅनच्या लक्षात आला आणि त्याने २०१६ मध्ये बारविनवर केस ठोकली. बारविन अनेक वर्षांपासून कॅनडात फर्टिलिटी क्लीनिक चालवत होता. अशात डॅनसोबतच दुसरे लोकही डॉक्टर विरोधात केस करू लागले. कारण त्याने अनेक महिलांसोबत स्पर्मची फसवणूक केली होती.

आतापर्यंत असे १०० पेक्षा जास्त लोक समोर आले आहेत. त्यांनी आरोप केला की, डॉक्टरने आपल्या स्पर्म द्वारे त्यांना प्रेग्नेन्ट केलं. रेबेकासहीत साधारण १७ लोकांनी डीएनए टेस्टच्या माध्यमातून हे जाणून घेतलं की, फ्रटिलिटी डॉक्टर बारविन हाच त्यांच्या मुलांचा जैविक पिता आहे आणि त्याला बारविन बेबी नावाने ओळखलं जातं. 

अशात गेल्या काही दिवसात हे प्रकरण वाढलं तेव्हा डॉक्टर नॉर्मन बारविनला नुकसान भरपाई म्हणून पीडितांना १०.७ मिलियन डॉलर (७९ कोटी रूपये) देण्यास सांगण्यात आले. पण कोर्टात आरोपी आणि डॉक्टरच्या या प्रस्तावित कराराला कधीच मंजूरी मिळाली नाही. नोव्हेंबरमध्ये पुन्हा यावर सुनावणी होईल.

डॉक्टरच्या या कारनाम्याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा आयव्हीएफने जन्माला आलेल्या रेबेकाने आपल्या आई-वडिलांना तिच्या डोळ्यांचा रंग वेगळा असण्यावरून प्रश्न विचारला. असं सांगण्यात आलं की, निळ्या डोळ्यांच्या दाम्पत्यांना भुऱ्या रंगाचे बाळ होणे असामान्य आहे.  परिवारात असं पहिल्यांदाच झालं होतं. ज्यानंतर रेबेका डॉक्टरला भेटली आणि तिने डीएनए टेस्ट केली. टेस्टमधून समोर आलं की तिचा जैविक पिता डॅन नाही. असा अंदाज आहे की, १९७३ ते २०१२ दरम्यान बारविनने जवळपास ५०० महिलांना प्रेग्नेन्ट केलं. ज्यांना बाळ झाले. त्यामुळे पीडितांची संख्या २०० पेक्षा अधिक होऊ शकते.

रेबेकाच्या केसनंतर डॉक्टर बारविनकडून ट्रिटमेंट करणाऱ्या लोकांनी आपल्या बाळांची डीएनए टेस्ट केली. यात काही केसेस अशाही होत्या ज्यातत स्पर्म बदलण्यात आल्याचं समोर आलं. यातील जास्तीत जास्त बाळांचा जैविक पिता स्वत: ड़ॉक्टर निघाला. आता डॉक्टरवर पोलीस केस करण्यात आली आहे. ज्यानंतर त्याला शिक्षाही होऊ शकते.
 

Web Title: Fertility doctor exposed, he secretly impregnate 17 women with his own sperm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.