नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी; पोलिसात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:59 PM2019-10-20T15:59:11+5:302019-10-20T16:01:19+5:30

याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

Fighting among the Bahujan vikas aghadi and Mahayuti workers in Nalasopara; Case registered in Nalasopara police station | नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी; पोलिसात गुन्हा दाखल 

नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी; पोलिसात गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देशर्मा पैसे गोळा करत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात रात्री ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पहाटे उशीरापर्यंत शर्मा यांच्या निवासस्थानी पोलीस जबाब नोंदवत होते. नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल केला. 

नालासोपारा - नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि महायुतीच्या कार्यकर्त्यात काल रात्री जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या ताफ्यातील दोन वाहनांची नासधूस करण्यात आली. शर्मा पैसे गोळा करत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात रात्री ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रदीप शर्मा यांच्या कारमध्ये मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे असल्याचा संशय आल्याने पोलिसांना कारची तपासणी करण्यास कार्यकर्ते सांगत असताना प्रदिप शर्मा यांच्या अंगरक्षकांनी बविआ कार्यकर्त्यांवर हात उगारला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या दोन्ही वाहनांच्या काचा फोडून संताप व्यक्त केला.

शर्मा यांच्या वाहनचालकाने त्याही परिस्थितीत गाडी भरधाव वेगाने वसईच्या दिशेने नेल्यामूळे त्यांच्या वाहनात खरोखरच पैसे होते का असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, ते राहात असलेल्या सनसिटी परिसरातही बविआ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. याबाबत पहाटे उशीरापर्यंत शर्मा यांच्या निवासस्थानी पोलीस जबाब नोंदवत होते. नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल केला. 

Web Title: Fighting among the Bahujan vikas aghadi and Mahayuti workers in Nalasopara; Case registered in Nalasopara police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.