बाईकची नंबर प्लेट तुटल्याच्या कारणावरून तरुणांत झाला राडा, एकाच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:54 IST2022-05-17T20:47:33+5:302022-05-17T20:54:14+5:30
Murder Case : घटना सोमवारी रात्री शाळा क्रं-२४ च्या समोर घडली असून आरोपी करण जसोजा याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली.

बाईकची नंबर प्लेट तुटल्याच्या कारणावरून तरुणांत झाला राडा, एकाच मृत्यू
सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजी विक्रेते असलेल्या भरत पाटाडीया यांच्या टेम्पोच्या धडकेने मोटरसायकलची नंबरप्लेट तुटलेच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत पाटाडिया यांचा मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी रात्री शाळा क्रं-२४ च्या समोर घडली असून आरोपी करण जसोजा याला उल्हासनगरपोलिसांनीअटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ नेहरूनगर परिसरात राहणारे भाजी विक्रेते असलेले भरत उर्फ सोनू पाटाडिया हा मित्र आकाश संचेरीया यांच्या सोबत टेम्पोने सोमवारी रात्री १० च्या सुमारास घरी जात होते. यावेळी टेम्पोचा धक्का एका मोटरसायकलला लागला. मोटरसायकलस्वाराने टेम्पोच्या समोर मोटरसायकल आडवी उभी करून मोटरसायकलची नंबरप्लेट तुटल्याचे सांगून भरत पाटाडिया याला जाब विचारून मारहाण सुरू केली. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या पाटाडिया याला मित्र अजय संचेरीया याने नागरिकांच्या मदतीनेबरुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी तपास करून आरोपी करण जसोजा याला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.