दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणावरून मार्केटमध्ये व्यापाऱ्यात हाणामारी; एकजण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:42 PM2021-08-04T16:42:59+5:302021-08-04T17:19:51+5:30

Fighting in Ulhasnagar Market : उल्हासनगर फर्निचर मार्केटमध्ये व्यापाऱ्यात बेदम मारामारी

Fighting in the market over the reason for setting the tempo in front of the shop; One seriously injured | दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणावरून मार्केटमध्ये व्यापाऱ्यात हाणामारी; एकजण गंभीर जखमी 

दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणावरून मार्केटमध्ये व्यापाऱ्यात हाणामारी; एकजण गंभीर जखमी 

Next
ठळक मुद्देमारहाणीत अजय माखीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री मुंबईला नेण्यात आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : फर्निचर मार्केटमध्ये दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणास्तव मंगळवारी सायंकाळी व्यापाऱ्यात हाणामारी झाली. मारहाणीत अजय माखीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री मुंबईला नेण्यात आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-३ फर्निचर मार्केट मध्ये सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान दुकानात आलेले साहित्य काढण्यात येत होते. यावेळी शेजारील व्यापारी दर्शनसिंग सरोज याने येऊन टेम्पोच्या चाकातील हवा काढली. दुकाना समोर टेम्पो उभा का केला? असा प्रश्न दुकानदार विजय माखीजा यांचा मित्र अजय याला दर्शनसिंग याने केला. तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करून दोघांना मारहाण केली. काही वेळा नंतर सुरजितसिंग सरोज गुरुमुखसिंग सरोज, दर्शनसिंग सरोज, जगतारसिंग सरोज, फतेपालसिंग सरोज यांनी संगतमत करून लोखंडी रोडने विजय माखीजा व अजयच्या डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झाले. मारहाणीत अजय गंभीर जखमी झाल्याने, मध्यरात्री त्यांना मुंबई येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यापाऱ्यांतील मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.



 मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दर्शनसिंग सरोज यांच्यासह जगतारसिंग सरोज, फतेपालसिंग सरोज, गुरुमुखसिंग सरोज सुरुजीतसिंग सरोज अश्या ५ जणांविरोधात मारहाण प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. टेम्पो दुकाना समोर उभा केला. याक्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली असुन शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजू उभ्या राहणाऱ्या गाड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सुरवाडकर पुढील तपास केला आहे.  

Read in English

Web Title: Fighting in the market over the reason for setting the tempo in front of the shop; One seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.