निगडीत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 04:19 PM2020-05-26T16:19:35+5:302020-05-26T16:20:14+5:30

आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केली.

Fighting two related groups in nigdi; Filed a crime against each other | निगडीत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल

निगडीत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद ; दोन्ही गटातील दहा जणांना अटक

पिंपरी : आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केल्याची घटना नुकतीच रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी येथील संग्रामनगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांना अटक केली आहे.
निगडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज वल्ली तांबोळी (वय ३९, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फियादीर्नुसार, मंथन गायकवाड (वय २१), नाना गायकवाड (वय ३४), नवा कांबळे (वय १९), लखन मस्के (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, चेतन गायकवाड, कृष्णा मस्के, कुणाल, भैया, सोन्या कांबळे, भिमाबाई गायकवाड, राजू गायकवाड (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिराज यांचे दाजी रमजान तांबोळी यांच्या घरासमोर आरोपी आरडाओरडा करत होते. रमजान यांनी आरडाओरडा करू नका, आम्हाला झोपायचे आहे असे म्हटले. त्यावरून आरोपींनी सिराज, त्याचे मित्र अब्दुल मासुलदार, अमजद मोहिद्दिन शेख, बहीण शबाना तांबोळी, दाजी रमजान तांबोळी यांना कोयत्याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरासमोर पार्क केलेल्या रिक्षाचे नुकसान केले.
लखन बळीराम म्हस्के (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फियादीर्नुसार, शकील उर्फ  रमजान जलाल तांबोळी (वय ३८), अमजद मुद्दीन शेख (वय ३०), अरबाज शेख (वय २०), सिराज शेख (वय १९), कासिम जाफर शेख (वय ३०), अब्दुल आयुब मसुलदार (वय २४) या सहा जणांना अटक केली आहे. शमीम शेख (वय ३०), सद्दाम पटेल (वय ३८, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून  म्हस्के यांच्या घरात घुसून त्यांना कोयता, लोखंडी पाईप आणि दगडाने मारून जखमी केले. भीमाबाई गायकवाड आणि उमेश साठे यांच्या घरात घुसून घरातील वस्तूंचे नुकसान केले.

Web Title: Fighting two related groups in nigdi; Filed a crime against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.