तळेगाव दाभाडे येथे विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:20 PM2020-07-21T17:20:34+5:302020-07-21T17:24:58+5:30

मुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण

File case against father-in-law for physical and mental abuse of married woman at Talegaon Dabhade | तळेगाव दाभाडे येथे विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे येथे विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण

पिंपरी : गाडी घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच मुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून विवाहितेचा छळ केला. तळेगाव दाभाडे येथे १३ सप्टेंबर २०१६ ते १८ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
राहुल राजेंद्र मांजरेकर (क्य ३०), रजना राजेंद्र मांजरेकर, राजेंद्र लक्ष्मण मांजरेकर, प्राची अमर माने (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपी राहुल याच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी फिर्यादी यांच्याकडे केली. तसेच सासरच्यांना मुलगा हवा होता. मात्र फिर्यादी यांना मुलगी झाली. या कारणावरून त्यांनी फिर्यादी यांचा छळ केला. तसेच आरोपी पती राहुलचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 
दरम्यान, पती राहुल मांजरेकर यांनी देखील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी, सासू व मेव्हणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
 

Web Title: File case against father-in-law for physical and mental abuse of married woman at Talegaon Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.