Mayuresh Raut: परमबीर सिंगांवर आरोप करणारे बिल्डर मयुरेश राऊत यांचाच पाय खोलात; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:18 PM2021-06-01T16:18:50+5:302021-06-01T16:40:43+5:30
Filed a case against Builder Mayuresh Raut : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांवर आरोप करणारे विरारचे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा
वसई - मुंबईतील वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि ठाण्यातील मयत मनसुख हिरेन प्रकरणानंतर चर्चेत येऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करणाऱ्या विरारमधील बिल्डर मयुरेश राऊत यांच्याच विरोधातच आता तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि एमआरटीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. Filed a case against Builder Mayuresh Raut, who has allegations on Parambir Singh
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार शहर महापालिका प्रभाग समिती "ब" अनधिकृत बांधकामाचे लिपिक अक्षय मोखर (वय २९) यांनी गुरुवारी तुळींज पोलीस ठाण्यात नालासोपारा पूर्व विजयनगर येथे मौजे तुळींज सर्वे क्रं. 221 हिस्सा क्रं.1 येथे बनावट बांधकाम परवाने तयार करून 4 मजली इमारत बांधून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक केली म्हणून बिल्डर मयुरेश राऊत व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतर भागीदारांवर सुद्धा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. मयुरेश राऊत हे ठाण्यातील मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर प्रकाश झोतात आले होते.
गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा https://t.co/lOpADfwH1v
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
धक्कादायक प्रकार म्हणजे मुंबईतील सचिन वाझे प्रकरण सुरू असतानाच त्यांनी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करत आपल्या जीवाला धोका असल्याचे माध्यमाद्वारे सांगितले होते.