महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:40 PM2022-01-02T20:40:45+5:302022-01-03T14:36:28+5:30
Filed a case against the developer of ‘Bulli Bai' app : याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.
मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फ़ोटो टवीटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत, मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल pic.twitter.com/VstK2epSfi
— Lokmat (@lokmat) January 2, 2022
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला
याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.