अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:27 PM2021-05-27T18:27:39+5:302021-05-27T18:28:09+5:30

Filed a case against Jitendra Bhave : यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Filed a case against Jitendra Bhave, a half nude agitator; Complaint lodged by Vision Hospital | अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार

अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार

Next
ठळक मुद्देशहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते.

नाशिक : शहरातील कॉलेजरोडवरील विजन रुग्णालयात एका रुग्णावर करण्यात आलेल्या उपचारखर्चाची मुळ कागदपत्रांची मागणी करण्यासाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’चळवळीचे जितेंद्र भावे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह शनिवारी (दि.२२) पोहचले. त्यांनी मयत कोविड रुग्णाच्या उपचारखर्चाांची मुळ बिले व अन्य कागदपत्रांची मागणी केली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रार सरकारवाडा पोलिसांकडे डॉक्टरांनी केली आहे. यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते. हे आंदोलन सोशलमिडियावरुन थेट प्रसारित करण्यात आल्याने ते चांगलेच चर्चेत आले. दरम्यान, गेल्या शनिवारी भावे हे विजन रुग्णालयात अवाजवी बिल आकारल्याची तक्रार घेऊन गेले होते.
कोरोनाबाधित दत्तात्रय पांडुरंग आटवणे यांच्यावर औषधोपचार सुरु असताना शुक्रवारी (दि.२१) ते विजन रुग्णालयत मयत झाले. यानंतर मयताचे नातेवाईक स्वप्नील आटवणे, सायली आटवणे, यांच्यासह जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे आदिंनी कोविड कक्षात येऊन शनिवारी गर्दी केली.तसेच रुग्णालयाने जास्त बिलांची रक्कम आकारल्याचे सांगत रुग्णावर काय व कोणत्या प्रकारचे उपचार केले, त्याची मुळ कागदपत्रांची मागणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांना धमकावून दैनंदिन वैद्यकिय कामकाजात अडथळा निर्माण करत मेडिकल, रक्त तपासण्यांसाठी आलेल्या खर्चाची रक्कम न देता रुग्णालयातून निघून गेले असे डॉक्टर विक्रांत विनोद विजन (३७, पाटील लेन, कॉलेजरोड) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित जितेंद्र भावे, स्वप्नील आटवणे, रोहन देशपांडे, सोमा कुऱ्हाडे यांच्याविरुध्द अशा पाच लोकांवर वैद्यकिय सेवा, व्यक्ती, संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी अधिनियम २०१०नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Filed a case against Jitendra Bhave, a half nude agitator; Complaint lodged by Vision Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.