नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:00 PM2020-09-29T22:00:31+5:302020-09-29T22:00:42+5:30

बनावट दस्ताऐवज बनवून केली फसवणूक

Filed a case of fraud against the wife of town planning joint director Hanumant Nazirkar | नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांची आणखी प्रकरणे उघड होऊ लागली आहे़ भागीदारी फर्ममधील मुळ भागीदारांच्या बनावट सह्या करुन बनावट दस्ताऐवज करुन फसवणुक केल्याप्रकरणी संगिता नाझीरकर यांच्यासह ९ जणांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

संगिता नाझीरकर (रा़ स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड), चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, रुषभ ओसवाल (सर्व रा़ मार्केटयार्ड) अ‍ॅड़ सय्यद इनामदार (रा़ वानवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ 
याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय ४४, रा़ बारामती) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, संग्राम सोरटे व मधुकर विठोबा भरणे यांनी २०१३ मध्ये ओम साई डेव्हलपर्स ही भागीदारी फर्म सुरु केली होती़ काही काळाने त्यांचे नातेवाईक हनुमंत नाझीरकर व संगिता नाझीरकर यांनी चंद्रकांत निवृत्ती गरड (रा़ हडपसर) हे त्यांच्या फर्ममध्ये सहभागी होऊ इच्छित असल्याचे सांगितले़ त्यानुसार संगीता नाझीरकर यांचा भागीदारी हिस्सा ५० टक्के, गरड यांचा २० टक्के आणि सोरटे व भरणे यांचा १५ टक्के भागीदारी हिस्सा निश्चित करण्यात आला़ त्यांच्या फर्मने धायरी येथे एक जागा विकसनाकरीता घेतली़ त्या ठिकाणी सोरटे हे मे २०१९ मध्ये गेले असताना त्यांना दुसरीच लोक दिसून आली़ चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही या फर्मचे ८० टक्के भागीदार असून त्यासाठी आम्ही नाझीरकर यांना ८ कोटी २३ लाख ६१ हजार ४२० रुपये दिल्याचे सांगितले़, तशी कागदपत्रे त्यांनी सोरटे यांना दाखविली़ त्यात सोरटे आणि इतर तिघांना प्रत्येकी ५ टक्के हिस्सा दाखविण्यात आला होता़ नाझीरकर व गरड यांनी सोरटे व भरणे यांना धायरी येथील प्रकल्पामध्ये आर्थिक नुकसान व्हावे व त्यांचा इतर भागीदार यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आपल्या संमतीशिवाय खोट्या सह्या करुन, फर्ममधील १५ टक्के असलेला हिस्सा हा परस्पर ५ टक्के करुन आर्थिक फसवणूक करण्यासाठी बनावट भागीदारी पत्र व समझोता करारनामा असे खोटे दस्तऐवज तयार करुन त्यावर सोरटे यांची बनावट सही करुन नोटरी सय्यद इनामदार यांनी हा खोटा दस्ताऐवज आपण समक्ष हजर नसताना नोंदवून घेतला व तो बनावट दस्त खरा म्हणून वापरला व फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४०९, ४६८ आणि ३४ अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़ सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Filed a case of fraud against the wife of town planning joint director Hanumant Nazirkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस