आसिफ खान अपहरण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:40 PM2018-08-26T13:40:01+5:302018-08-26T13:42:00+5:30

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी  आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.

 Filed a murder case in Asif Khan Abduction case | आसिफ खान अपहरण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

आसिफ खान अपहरण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी आठ दिवस तपासणी मोहीम राबविल्यानंतर रोहणा या गावाजवळ आसिफ खान मुस्तफा खानचा मृतदेह आढळला. मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी  आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सहाही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांना २७ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती अनिल गणेशपुरे हिने वाडेगाव येथील रहिवासी आसिफ खान मुस्तफा खान यांना १६ आॅगस्ट रोजी तिच्या बहिणीचे घर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आमला येरंडी या गावात बोलावले. त्या ठिकाणी आसिफ खानची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. या हत्येसाठी ज्योती गणेशपुरे हिने तिचा मुलगा वैभव अनिल गणेशपुरे, स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे, वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले व अशोक श्रावण साबनकर यांचाही वापर केला. हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग परिसरात पूर्णा नदीपात्रात फेकण्यात आला. अकोला पोलिसांनी आठ दिवस तपासणी मोहीम राबविल्यानंतर रोहणा या गावाजवळ आसिफ खान मुस्तफा खानचा मृतदेह आढळला. दरम्यान, या प्रकरणात आरोपींनी आधीच हत्येची कबुली दिली होती; मात्र मृतदेह सापडत नसल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. शुक्रवारी मृतदेह आढळताच पोलिसांनी ओळख पटविली आणि सदर सहा जणांविरुद्ध मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी केली.
 
मूर्तिजापूर ठाणेदारांची टोलवाटोलवी!
मूर्तिजापूर शहरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे या गंभीर प्रकरणातही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचे दिसून येत आहेत. हायप्रोफाइल हत्याकांड असताना या हत्या प्रकरणाचे गांभीर्य ठाणेदारांना नसल्याची चर्चा पोलीस खात्यात जोरात सुरू आहे.
 
डीएनए चाचणी होण्याची शक्यता
आसिफ खान यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली असली तरीही डीएनए चाचणी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. आसिफ खान यांच्या पायावरील भरलेल्या जखमा व टी-शर्टवरून सदरचा मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले; मात्र कोणताही संशय नको म्हणून पोलीस डीएनए चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

 

Web Title:  Filed a murder case in Asif Khan Abduction case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.