फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 03:08 PM2021-02-08T15:08:41+5:302021-02-08T15:09:22+5:30

Abduction :  ७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी खेड घाटाच्या वरती माळेगाव ( ता खेड ) येथील पुणे -नाशिक महामार्गालगत हॉटेल सुर्यकांता खानवळीत थांबले होते.

Film-style abduction of two newly elected Gram Panchayat members | फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण 

फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण 

Next
ठळक मुद्देविठ्ठल भाऊसाहेब कवाद (रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजगुरुनगर -  शस्त्राचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केल्याची घटना राजगुरूनगर येथील खेड घाटात घडली आहे. याबाबत विठ्ठल भाऊसाहेब कवाद (रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
               

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की,पारनेर तालुक्यातील निघोज गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजकिय सहलीसाठी गेले होते.  ७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी खेड घाटाच्या वरती माळेगाव ( ता खेड ) येथील पुणे -नाशिक महामार्गालगत हॉटेल सुर्यकांता खानवळीत थांबले होते. दरम्यान सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात असताना सचिन मच्छिंद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनिल मच्छिंद्र वराळ, निलेश राजु घोडे, अजय संजय वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, स्वप्निल भाऊसाहेब दुनगुले, सुभाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव हे सर्व (रा. निघोज,ता. पारनेर , जि, अहमदनगर ) व इतर १५ते २० जणांनी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या कारणावरून फिर्यादीला काठीने मारहाण केली. शिवीगाळ व धमकी देऊन तलवारीची व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दिगंबर भागाजी लाळगे, आणि गणेश दत्तू कवाद या दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीत घातले. फिर्यादीचे मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून नुकसान करण्यात आले. दोन सदस्यांना घेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले..या प्रकरणी निघोज गावातील २५ जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खेड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत भोसले करित आहे.

Web Title: Film-style abduction of two newly elected Gram Panchayat members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.