फिल्मी स्टाईलने हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले, भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:37 PM2020-09-03T17:37:40+5:302020-09-03T17:40:16+5:30
क्राईम ब्रँचची धाडसी नेत्रदीपक कामगिरी
पणजी: संपूर्ण राज्यात दहशत माजविणाऱ्या मडगावमधील स्वप्नील वाळकेच्या निर्घृण हत्या करणाऱ्यांपैकी ओंकार पाटील आणि एडीसन गोन्साल्वीस यांना क्राईम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखालील टीमने पणजीत उत्तररात्री फिल्मी स्टाईलने पकडले. तसेच तिसरा व मुख्य संशयित् मुश्ताफाही पोलिसांच्या ताब्यात आला. तिघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. स्वप्नील वाळके हे भाजपाच्या राज्य कार्यकरणीच्या सदस्या कृष्णा वाळके यांचा तो मुलगा होता.
खुन करून पळालेल्यात एक मुश्ताफा शेख होता हे अनेकांनी पाहिले होते. क्राईम ब्रँचच्या एका पथकाने त्याच्या जवळच्या मित्रावर ओंकार पाटील याच्यावर नजर ठेवली. सांताक्रूझ पणजी येथे त्याचे एक दुकान आहे. त्या दुकानात त्याच्या आईच्या समोरच त्याला अगोदर ताब्यात घेतले. त्याची पोलीस वाहनातच रात्री उशिरापर्यंत दीर्घवेळ चौकशी केली. मुश्ताफाची माहिती तो काही देत नव्हता. परंतु शेवटी पोलिसांचे लक्ष्य दुसरीकडे वळविण्याच्या हेतूने त्याने आपण स्वत: एका बॉलेरो कारची चोरी केल्याचे पोलिसांना सांगून टाकले. कार कुठे आहे असे विचारताच ज्या ठिकाणी स्वप्नीलचा खून झाला त्या ठिकाणी असल्याचे सांगितले. तितके ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्याला अटक नेले. पुढचा तपास करणे पोलिसांना सोपे गेले. त्याच्याच माहितीवरून पोलिसांनी एडीसन गोन्सल्वीसलाही पकडले.
पणजी ते मडगाव धाडसी पाठलाग
मुश्ताफा मडगाव पोलिसांना शरण आल्याचे जरी सांगितले जात आहे तरी वास्तविक त्याला नाक मुठीत धरून शरण येण्याची पाळी त्याच्यावर क्राईम ब्रँचनेच आणली ही वस्तुस्थिती आहे. मुश्ताफा हा पणजीत कुठे तरी असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी त्याच्या पथकाला दिला. या पथकाला ही माहिती मिळेपर्यंत कदंब बसमधून मुश्ताफा पणजीहून मडगावला निघाला होता. महिती मिळाल्यावर क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याचा सुसाट पाठलाग केला. त्या कदंब बस चालकाचा फोन क्रमांक मिळवून त्याला त्याची माहिती दिली. परंतु तोपर्यंत मुश्ताफा बसमधुन उतरून भाड्याच्या मोटरसाईकलवरून (पाईलट करून) पसार झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. अवघ्या दोन मिनिटांनी तो क्राईम ब्रँचच्या हातून बचावला. परंतु हे पथक आपल्याला कोठूनही हुडकून काढतील हे ओळखून तो त्यापूर्वीच मडगाव पोलिसांना शरण गेला.
हे आहेत खरे हिरो
या बुधवार रात्रीपासून गुरूवारी दुपारपर्यंतच्या धाडसी आणि यशस्वी कामगिरीसाठी प्रत्यक्ष फिल्डवरील हिरो होते निरीक्षक दत्तगुरू सावंत, हेड कॉन्स्टेबल दिनेश पिकुळकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, इर्माया गुरय्या, नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर आणि किरण परब. स्थानिक पोलिसांना शोधाशोध व अटक करण्यात काही मर्यादा पडत असल्यामुळे क्राईम ब्रँचच्या पथकाने हे शोधकार्य हात घेून ते धसासही लावले. त्यासाठी पोलिसांची दोन पथके बनविण्यात आली. उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी सातत्याने शोधकार्यावर देखरेख ठेवली. यशस्वी टीमवर्क आणि अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे त्या सांगतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर
ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त