मुंबईत फिल्मीस्टाईल थरार; ड्रग्ज तस्करानं NCB अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:27 AM2021-05-22T08:27:52+5:302021-05-22T08:28:45+5:30

पलायनाच्या नादात नेले फरफटत; अंधेरीत एनसीबी अधिकारी जखमी

Filmstyle thrill in Mumbai; The drug smuggler took the NCB officer for a distance of 200 meters | मुंबईत फिल्मीस्टाईल थरार; ड्रग्ज तस्करानं NCB अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं

मुंबईत फिल्मीस्टाईल थरार; ड्रग्ज तस्करानं NCB अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं

googlenewsNext

मुंबई : ‘एनसीबी’ची ड्रग्ज तस्करांवर धडक कारवाई सुरू असताना, अंधेरी येथे ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा पाठलाग करताना दोन अधिकारी जखमी झाले. यात एका ड्रग्ज तस्कराने अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे रंगणारी घटना गुरुवारी घडली. यात एका तस्कराला अटक करण्यात एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. 

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले, गुरुवारी अंधेरीच्या वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट रोड परिसरात ३ तस्कर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. तस्कर ड्रग्ज देण्यासाठी दुचाकीवरून तेथे धडकताच पथकाने त्यांच्याकडे धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करूनही दोन तस्कर पळून जाण्यात  यशस्वी झाले, तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याने अन्य एका तस्करावर झडप घातली. अधिकाऱ्याने त्याला पकडताच त्याने त्या अधिकाऱ्याला फरफटत नेत पळ काढला. यात तो अधिकारी जखमी झाला आहे, तर आणखी एका तस्कराने दुचाकीवरून उडी घेत रहिवासी इमारतीच्या दिशेने पळ काढला. अधिकाऱ्याने त्याचा पाठलाग करीत त्याला पकडले. 

यादरम्यान तस्कराने अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अधिकारी जखमी झाला. मात्र, त्याने तस्कराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकड़ून ६२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या तस्कराचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचा एनसीबी अधिकाऱ्यांचा कयास आहे.

 

Web Title: Filmstyle thrill in Mumbai; The drug smuggler took the NCB officer for a distance of 200 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.