अखेर राज्यातील ९७ पोलीस निरीक्षकांच्या बढत्यांना मुहूर्त मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 08:05 PM2019-07-29T20:05:21+5:302019-07-29T20:16:05+5:30
मुंबईतील ३४ अधिकाऱ्यांचा समावेश; गृह विभागाचे आदेश जारी
मुंबई : गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या राज्य पोलीसा दलातील निरीक्षकांच्या बढत्यांना अखेर ‘मुहूर्त’मिळाला आहे. मुंबईसह विविध घटकांत कार्यरत असलेल्या ९७ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक म्हणून बढती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३४ वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे.
गेल्या वर्षभरापासून ‘पीआय’ची पदोन्नती रखडली होती. बढतीच्या प्रतिक्षेत अनेक अधिकारी सेवा निवृत्त झाले. गेल्या १२ जूनला राज्यातील १०४ निरीक्षकांना सेवा जेष्ठतेनुसार बढती देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरची कार्यवाही पुर्ण करण्यास गृह विभागाने तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ घेतला आहे. या कालावधीत ७ अधिकारी रिटायर झाले.
पदोन्नती मध्ये नवी मुंबई अशोक नाईक (ठाणे ग्रामीण),विनोद चव्हाण ( रेल्वे मुंबई) यांचा समावेश आहे.
मुंबईतील अधिकाऱ्यांची नावे अशी ( कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण) :
राजेंद्र चिखले,पांडूरंग दराडे, भारत भोईटे, रामचंद्र जाधव, सुनिल बाजारे, सुर्यकांत नौकुडकर, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश शिंदे, विजय बाणे, श्रीकांत देसाई, राजीव सावंत, बाळकृष्ण माने, अविनाश कानडे, प्रमोद कदम, सुभाष जाधव (सर्व मुंबई), लक्ष्मण भोगन (अमरावती शहर), दिपक फटांगरे, अब्दुल अजिज बागवान, राजेंद्र पाटील (सर्व रेल्वे मुंबई), भागिरथ शेळके (एसआयडी), माधव जोशी (अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा), विलास जाधव (जालना रेल्वे), पोमाजी राठोड (पुणे शहर), सुरेखा कपिले ( नागपूर), मृदला लाड- नार्वेकर (आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम), जोत्स्ना रासम (पुणे शहर), रश्मी जाधव (महिला व बाल अपराध प्रतिबंधक,मुंबई), कल्पना गाडेकर (नक्षलविरोधी अभियान, नागपूर), रेहाना शेख (बुलढाणा), संजय सुर्वे ( पोलीस महासंचालक कार्यालय), सुहास सातार्डेकर ( जात पडताळणी, वशिम), वसंत पिंगळे ( जात पडताळणी, यवतमाळ), उदयकुमार राजशिर्के (जातपडताळणी, अमरावती) अनिल माने ( पांढरकवडा)
मुंबईतील इतर अधिकाऱ्यांना मिळणार पोस्टींग
वरिष्ठ निरीक्षकांच्या बढत्या प्रलंबित राहिल्याने मुंबईतील निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या गेल्या दोन महिन्यांपासून रेंगाळल्या आहेत. ३४ अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने आता त्यांच्या जागी ३४ निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर १२५ वर बढती मिळालेल्या निरीक्षकांना पोस्टींग दिले जाणार आहे. येत्या आठवड्याभरात मुंबई आयुक्तांकडून संबंधितांच्या नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.