अखेर ‘त्या’ विकृताला अटक, नयानगर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 01:25 AM2019-05-05T01:25:33+5:302019-05-05T01:25:53+5:30

मीरा रोडच्या नयानगर भागात अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महेफूज मकसूद आलम शेख (२१) असे आरोपीचे नाव आहे.

Finally, the 'arrest' of the accused, the action of the Nayanagar police | अखेर ‘त्या’ विकृताला अटक, नयानगर पोलिसांची कारवाई

अखेर ‘त्या’ विकृताला अटक, नयानगर पोलिसांची कारवाई

Next

मीरा रोड / भार्इंदर : मीरा रोडच्या नयानगर भागात अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महेफूज मकसूद आलम शेख (२१) असे आरोपीचे नाव आहे.

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ एप्रिलला एक ११ वर्षांची मुलगी स्टेशनरीच्या दुकानातून वस्तू विकत घेऊन घरी परतत होती. त्यावेळी टोपी घालून आलेल्या शेखने तिच्याशी अश्लील प्रकार केला. या प्रकाराने घाबरून मुलगी घरी पळाली आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तोच दुसºया दिवशी १५ एप्रिलला नयानगर भागातच रात्री ११ वा.च्या सुमारास एका २२ वर्षीय तरु णीला गाठून त्याने तसाच प्रकार केला होता. याप्रकरणीही नयानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असता त्याचे छायाचित्र पोलिसांनी व्हायरल करत ओळख पटल्यास कळवण्याचे आवाहन उपनिरीक्षक सोहेल पठाण यांनी केले होते. परंतु, सलग दोन दिवस घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मीरा रोड, नवी मुंबई आदी भागांत रेहान कुरेशी या विकृताने विनयभंग, अत्याचार, हत्या आदी प्रकार केले असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे तपास सोपवला होता.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजसह खबऱ्यांच्या आधारे विकृत शेखची ओळख पटली होती. परंतु, पोलीस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तो सापडला नाही. सलग दोन घटनांमुळे नयानगर परिसरात मोठी खळबळ उडून त्याचा फोटोही व्हायरल झाल्याने शेख हा लखनऊला नातेवाइकाकडे पळून गेला होता.
शुक्रवारी तो लखनऊहून मीरा रोडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. शेखला नयानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली होती.

२०१७ मध्ये झाले होते लग्न
शेखचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. परंतु, तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत तसेच विकृत असल्याचे लक्षात येताच त्याची पत्नी महिनाभरातच त्याला सोडून माहेरी गेली. असे यावेळी पोलिसांनी सांगितले. त्याने यापूर्वीही असे प्रकार केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Finally, the 'arrest' of the accused, the action of the Nayanagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.