शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:12 PM2021-03-13T21:12:10+5:302021-03-13T21:13:08+5:30

Mira Road News : शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे

Finally a case filed against the Seven Eleven Hotels for grabbing the land of farmers | शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल 

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल 

Next

मीरारोड - पोलीस व पालिकेस सतत तक्रारी केल्यावर  भाईंदरच्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे . (Finally  a case filed against the Seven Eleven Hotels for grabbing the land of farmers )

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . सदर जमिनीवर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने बळजबरी कुंपण घालून आत मध्ये काही झोपड्या उभारल्या होत्या . सदर प्रकार समजल्यावर मे २०१९ पासून रकवी कुटूंबियांनी मीरारोड पोलीस ठाणे आणि महापालिके कडे सतत तक्रारी चालवल्या होत्या . परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते . 

तर दुसरीकडे अमोल व गजेंद्र रकवी यांनी पोलिस व पालिकेत तक्रारी चालवल्या होत्या .  कंपनीचे मुख्य भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहतांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती . रकवी कुटुंबीय त्यांची जमिनी कब्जा करणाऱ्यां विरोधात उभे ठाकले . २४ नोव्हेम्बर २०२० रोजी मीरारोड पोलिसांनी ६८ वर्षीय अमोल रकवी यांचा जबाब नोंदवून घेतला होता . दरम्यान पोलिसांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांना बोलावून जागेस घातलेले कुंपण व अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते . परंतु कंपनीने काहीच केले नाही . 

परंतु अमोल सह गजेंद्र रकवी, सचिन पाटील ,  महेश राऊत आदींनी पाठपुरावा सुरु ठेवला .  पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्या कडे तक्रार केली . सततच्या पाठपुराव्या नंतर पोलिसांनी त्यांच्या विधी अधिकारी यांच्या कडून अभिप्राय मागवला असता त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय दिला. 

तब्बल २२ महिन्यांनी पोलिसांनी अमोल रकवी यांची फिर्याद शुक्रवारी घेतली . घुसखोरी करून कुंपण घालणे , बेकायदा कब्जा करून तेथे ७ - ८ कच्चे बांधकाम करणे आदी प्रकरणी पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स संस्थेने , संचालक संजय सुर्वे व इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

६८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार अमोल रकवी म्हणाले कि , भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या जमिनी बळकावणाऱ्या माफियां विरुद्ध कारवाई साठी पोलीस व पालिके कडून अशी वर्ष नु वर्ष लावली जातात ह्याला कायद्याचे राज्य म्हणावे कि माफियांचे ? असा मला प्रश्न पडला आहे . पोलीस आता तरी मेहतांसह कंपनीचे त्यांचे अन्य भागधारक , संचालक आणि संबंधित लोकांवर कठोर कारवाई करून कायद्याची जाणीव करून देतील अशी अपेक्षा आहे .  

या आधी देखील मेहतांच्या कंपनीने  आमच्या मालकी जागेचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पडला होता . तर आणखी एका भूमिपुत्राच्या सुमारे ३७ जमिनी देखील बनावट स्वाक्षरी व बनावट मुखत्यारपत्र द्वारे विकल्याचे तक्रार सुद्धा गंभीर असल्याचे रकवी म्हणाले . 
 

Web Title: Finally a case filed against the Seven Eleven Hotels for grabbing the land of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.