अखेर महापालिकेच्या 'त्या' सात नगरसेवकांसह ३० ते ४० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:42 PM2021-03-15T18:42:06+5:302021-03-15T18:44:10+5:30
Crime Case : पालिकेच्या त्या सुरक्षा रक्षकांवर देखील कारवाई
ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात १०० ते १५० जणांच्या झूंडीने येऊन घेराव घालणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपाने पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांना जमा होण्याबरोबरच रोखण्यात टाळाटाळ केल्याबद्दल महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आता नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या गटनेत्यांसह अन्य सहा नगरसेवक आणि ३० ते ४० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे शहरात अनावश्यक असलेले तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याच्या प्रकारावर भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या खर्चातून शिवसेनेकडून निवडणूक निधी जमा केला जात असल्याचा आरोप केला होता. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी शिवसेनेने घेराव घातला, असा आरोप डुंबरे यांनी केला होता. दरम्यान शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह १००-१५० कार्यकर्ते गटनेत्यांच्या केबिनमध्ये विनामास्क घुसले. तसेच त्यांनी गटनेते डुंबरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करून आठ दिवसांत माफी मागण्यासाठी धमकी दिली. कोरोनाच्या काळात अशा प्रकारे गर्दी जमवून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला होता.
या संदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे एक निवेदनही देण्यात आले होते. त्यानंतर आता नौपाडा पोलीस ठाण्यात पाच पेक्षा जास्तचा जणांचा जमाव करणो, तोंडा मास्क न लावणो आणि नियमांचे पालन न केल्याने शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, साधना जोशी, विकास रेपाळे, सिध्दार्थ ओवळेकर, राजू पाठक आणि ३० ते ४० पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), 135 प्रमाणो तसेच कलम १८८ भादवि प्रमाणो तसेच साथीचे रोग अधिनियम सन १८९७ चे कलम व ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर शिवसैनिकांना जमा होण्याबरोबरच रोखण्यात टाळाटाळ केल्याबद्दल महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आता कर्तव्यात कसुर करणा:या सुरक्षा रक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. या संदर्भात सुरक्षा अधिका:यांना ते सुरक्षा रक्षक कोण कोण आहेत, त्यांच्याकडून ही चुक कशी झाली याची माहिती मागविण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.