Sachin Vaze Case: अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:56 PM2021-03-17T16:56:36+5:302021-03-17T16:58:59+5:30

Hemant Nagarale is the new Mumbai Police Commissioner : ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Finally Parambir Singh's removed from post; Hemant Nagarale will be the new Mumbai Police Commissioner | Sachin Vaze Case: अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Sachin Vaze Case: अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Next
ठळक मुद्देमध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून (Sachin Vaze Case) राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले असून कोणाचीतरी विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरु होत्या. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्वीटवरून मिळत आहे. संचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे. रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

'एवढं मोठं कारस्थान रचलं गेलं, तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही, हे नवलच !'

हेमंत नगराळे कोण आहे?
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. पुढील १९ महिने ते महाराष्ट्राचे डीजीपी म्हणून राहू शकतात. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. याआधी नगराळे हे पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. वाजेंच्या प्रकरणानंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतल्याने आता ते मुंबई पोलीस आयुक्त बनले आहेत. 

Sachin Vaze: वर्षावर हालचाली वाढल्या; पोलीस महासंचालक, आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची मध्यरात्रीपर्यंत खलबते

Sachin Vaze : सचिन वाजेंचा मोबाईल, कॉम्प्युटरसह कागदपत्रे जप्त; NIA कडून CIU कार्यालयाची झाडाझडती 

 

हेमंत नगराळे याआधी होते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त 

हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये प्रभात रंजन यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. आपल्या कारकीर्दीत नगराळे यांनी आयुक्तालयाचा कारभार उत्तम केला होता. मात्र, काही प्रकरणांमुळे त्यांचे नाव चर्चेतही होते. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची जूलै २०१८ साली बदली झाली असून त्यांच्या जागेवर संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. नागराळे यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता. त्यांनी आपले वजन वापरून नवी मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत होती. आता ते राज्याच्या लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलीस महासंचालक पदी कार्यरत आहेत. 

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजत होते. ही कारवाई झाल्यास आणखी बेअब्रू होईल, त्यामुळे त्यापूर्वी त्याची नैतिक जबाबदारी म्हणून आयुक्त परमबीर सिंग यांना बाजूला करावे, असे मत महाविकास आघाडीचे नेते आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांतून व्यक्त केले गेले आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला थोपविण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा होईल. त्यामुळे नव्या आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली होती. महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले होते. अखेर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. 

परमबीर सिंग यांच्या काळात काय घडलं?

गेल्या सव्वा वर्षापासून परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदी कार्यरत होते. सिंग यांच्या काळात कोरोनातील परिस्थिती, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींवरील कारवाई हे प्रकरण व्यवस्थित हाताळल्याने सरकारची त्यांच्यावर मर्जी होती. मात्र, स्फोटक कार प्रकरणातील मुंबई पोलिसांचा सहभाग ही मोठी नाचक्की असल्याने त्यांना हटविले आहे.

 

Read in English

Web Title: Finally Parambir Singh's removed from post; Hemant Nagarale will be the new Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.