अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:39 IST2021-05-22T19:37:05+5:302021-05-22T19:39:50+5:30
Wrestler Sushil Kumar arrested by Delhi Police : दिल्ल्ली पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये यांना अटक करण्यासाठी छापे टाकले होते.

अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक
नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर दिल्लीपोलिसांनी आज सुशील कुमारला पंजाबमधून अटक केली आहे. तसेच सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ल्ली पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये यांना अटक करण्यासाठी छापे टाकले होते.
पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाईल अशी देखील घोषणा केली होती. सुशील आणि अजयसह अन्य आरोपींविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी पहाटे १.१५ ते १.३० या वेळेत छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग परिसरात मल्लांच्या दोन गटात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत होताच फायरिंग झाले. त्यात पाच मल्ल जखमी झाले असून, त्यात सागर (२३), सोनू (३७), अमित कुमार (२७) आणि दोघांचा समावेश आहे. सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे वडील दिल्ली पोलिसांत हेडकॉन्स्टेबल आहेत. सागर आणि त्याचे मित्र ज्या फ्लॅटवर राहायचे तो फ्लॅट खाली करण्यासाठी सुशील दबाव आणत होता.
हत्या करुन पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 24 तासात अटकhttps://t.co/FPse3FTLuG
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2021
पोलिसांनी घटनास्थळावरून पाच वाहनांसह बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. सुशीलवरील गंभीर आरोपांचा तपास सुरू असून, त्याचा शोध घेण्यासाठी दिल्लीसह विविध राज्यांत धाडसत्र सुरूच असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. आधी लूक आउट नोटीस आणि नंतर अजामीनपात्र वॉरंट बजावूनही सुशीलचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही. न्यायालयाने विविध बाबी तपासल्यानंतर सुशीलसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.