आर्थिक फसवणूक करणारी टोळी अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:52 AM2019-08-11T04:52:07+5:302019-08-11T04:52:17+5:30

गुगलवरून मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम दुस-या खात्यात वळवून करून आर्थिक फसवणूक करणा-या बिहारी टोळीला वालीव पोलिसांनी गजाआड केले

financial fraud Gang arrested | आर्थिक फसवणूक करणारी टोळी अखेर गजाआड

आर्थिक फसवणूक करणारी टोळी अखेर गजाआड

Next

नालासोपारा -  गुगलवरून मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम दुस-या खात्यात वळवून करून आर्थिक फसवणूक करणा-या बिहारी टोळीला वालीव पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वसई पश्चिमेकडील दिवाणमान परिसरातील अंबाडी रोडवरील रामचंद्र अपार्टमेंटमधील सदनिका नंबर बी/२०७ मध्ये राहणारे देवेंद्र अमरनाथ सिंग (४२) यांचा मनी ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय आहे. वसई पूर्वेकडील चिंचोटी येथे सत्यम शिवम कम्युनिकेशन नावाचे त्यांचे दुकान आहे. या दुकानाच्या पी. डी. खात्यामधून २६ जूनला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ८ लाख ३७ हजार ९९८ रूपये वेगवेगळ्या खात्यात वळते झाल्याने वालीव पोलीस ठाण्यात १ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपासावरून तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुगलवरून दुकानाची माहिती घेऊन त्यावरील मोबाइल नंबर ट्रू कॉलरवर टाकून इमेल आयडी मिळवला. मोबाइलला पासवर्ड असल्याने पे बिंगो कंपनीच्या मनी ट्रान्सफर पोर्टलमध्ये जाऊन ८ लाख ३७ हजार ९९८ रुपये वेगवेगळ््या खात्यात वळविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.

त्यानंतर राजू कुमार विनोद प्रसाद, सरोजकुमार महेंद्र सिंग आणि नितीशकुमार रणजित प्रसाद या टोळीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

Web Title: financial fraud Gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.