रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, दाम्पत्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:09 AM2020-03-20T02:09:38+5:302020-03-20T02:09:51+5:30

मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक कार्यालयाची मोहर असलेले बुलावा पत्राबाबत रेल्वेचे कार्यालयात जाऊन खात्री केली. त्या वेळी ते बनावट असल्याचे स्पष्ट होताच तक्रारदारांनी रक्कम परत मागितली.

Fir against a couple | रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, दाम्पत्याविरोधात गुन्हा

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, दाम्पत्याविरोधात गुन्हा

Next

ठाणे - मुलीला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून समीर व उषा भिल्लारे (रा. खेवरा सर्कल) या दाम्पत्याने शहरातील नारळविक्रेते उमेश नाईक यांना चार लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाईक यांच्या आरोपानुसार भिल्लारे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.

पोखरण रोड येथे राहणारे नाईक यांचा लोकउपवन येथे हातगाडीवर नारळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे गि-हाईक असलेले समीर भिल्लारे याने नाईकांना त्यांची पत्नी उषा ही भारतीय जनता पक्षाची मोठी कार्यकर्ती असून, तिची सरकारी आॅफिसमध्ये ओळख आहे. तिने अनेकांना रेल्वेत कामाला लावले आहे. ती तुमच्या मुलीलाही रेल्वेत कामाला लावेल, त्यासाठी तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये रेल्वेच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असे २०१८ मध्ये सांगितले. तर उषा हिने नोकरीस लावलेल्या मुलांच्या आॅर्डरच्या प्रती दाखवून अ‍ॅडव्हॉस म्हणून चार लाख मागितले. त्यानंतर उषा हिने २५ फेब्रुवारी २०१९ ला मुलीचे मेडिकल वांद्रे येथील रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये करायचे आहे. त्यासाठी आणखी दोन लाखांची व्यवस्था करा नाहीतर नोकरी जाईल, असे सांगितले. त्यानुसार दोन लाख दिल्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये मेडिकल झाली. त्यानंतर फोनवरून विचारणा केल्यावर त्या दाम्पत्याने लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता चालू असून त्यात सरकारी नोकरीची कामे होत नाहीत, असे सांगितले. त्यानंतर नाईक यांनी मेरील एम यांचे नाव, मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक कार्यालयाची मोहर असलेले बुलावा पत्राबाबत रेल्वेचे कार्यालयात जाऊन खात्री केली. त्या वेळी ते बनावट असल्याचे स्पष्ट होताच रक्कम परत मागितली.

या बाबत पोलीस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज केल्यानंतर रावळ नावाच्या इसमाने दोन लाख रुपये परत केले. मात्र, भिल्लारे दाम्पत्याने चार लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, अद्यापही त्यांना अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Fir against a couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.