आयलानी कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा; दुकानातील कामगाराचा मारहाणीत समावेश
By अनिल गवई | Published: October 27, 2022 12:37 PM2022-10-27T12:37:12+5:302022-10-27T12:37:38+5:30
आठवडी बाजारातील दारूच्या दुकानाच्या वादातून निखिल सुनिल शर्मा या युवकाने आयलानी यांच्या अग्रसेन चौकातील दुकानात मंगळवारी रात्री धुडघुस घातला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आठवडी बाजारातील दारूच्या दुकानाच्या वाद प्रकरणाला आता वेगळेवळण मिळाले असून, अग्रसेन चौकातील ठोक औषध प्रतिष्ठानात मारहाण प्रकरणी जखमी युवकाच्या वडीलांच्या तक्रारीवरून आयलानी कुटुंबांतील चौघे आणि दुकानातील नोकर अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडी बाजारातील दारूच्या दुकानाच्या वादातून निखिल सुनिल शर्मा या युवकाने आयलानी यांच्या अग्रसेन चौकातील दुकानात मंगळवारी रात्री धुडघुस घातला होता. याप्रकरणी लक्ष्मण आयलानी यांच्या तक्रारीवरून युवकाविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जखमी युवकाचे वडील सुनिल शर्मा यांनी बुधवारी उशीरारात्री शहर पोलीसांत तक्रार दाखल केली. यात लक्ष्मण आनंदराम आयलानी, राम आनंदराम आयलानी, हितेश लक्ष्मण आयलानी, विनय राम आयलानी आणि एका अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम १४३, १४६, १४७, १४८, १४९, ३२४, २९४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.