शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:25 PM2021-05-20T16:25:43+5:302021-05-20T16:28:02+5:30

FIR filed against Sharjeel usmani : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

FIR filed against Sharjeel usmani for making objectionable tweets | शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देजालना येथील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे फिर्यादी अंबादास अंभोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते शरजील उस्मानी यांच्यावर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

जालना येथील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे फिर्यादी अंबादास अंभोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे ते म्हणाले.

या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम 295-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. हे प्रकरण जालना सायबर विभागात वर्ग करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.

या वर्षाच्या सुरूवातीस, पुणे पोलिसांनी 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या वेळी केलेल्या भाषणावरून उस्मानीविरोधात आयपीसी कलम  153 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात उस्मानी यांनी मार्चमध्ये पुणे पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता.

Web Title: FIR filed against Sharjeel usmani for making objectionable tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.