बेकायदेशीर तलाक प्रकरणी लातुरात पाहिला गुन्हा दाखल,
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 01:35 AM2019-08-15T01:35:38+5:302019-08-15T01:37:25+5:30
बेकायदेशीर तलाक व छळ केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.
लातूर : बेकायदेशीर तलाक व छळ केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.
पोलिसांनी सांगितले, नूरजहाँ रशिद शेख (56 रा. पटेलनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पती रशिद जानिमियाॅ शेख (ह.मु. करिम नगर, लातूर) याने आपल्या पत्नीस गत 35 वर्षापासून ते आजपर्यंत शाररिक, मानसिक त्रास देऊन मारहाण केली असून, तुझ्या मुलाच्या नावावर केलेले घर आणि दुकानाची जागा माझ्या नावावर कर.. असे म्हणून शिवीगाळ केली. शिवाय, तुझा व माझा आजपासून काहीच संबध नाही. मी तुला तलाक देत आहे. असे म्हणून तलाक...तलाक...तलाक...असे तीनदा बोलून बेकायदेशीर तलाक दिला. त्याचबरोबर फिर्यादी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पती रशिद जानिमियाॅ शेख याच्याविरोधात कलम 498 (अ), 323, 504, 506 आणि कलम 4 (मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोउपनि. एच. जे. सय्यद हे करीत आहेत.