''आमचो कोळीवाडो'' हॉटेलला भीषण आग, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:57 PM2018-08-27T13:57:02+5:302018-08-27T18:33:55+5:30
या आगीत हॉटेलचे खूप नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही.
वसई - वसई पश्चिमेकडे स्टेला माणिकपूर परिसरात असलेल्या प्रसिद्ध अशा हॉटेलला आज दुपारी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी आग विजविण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत हॉटेलचे खूप नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही.
वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील आमचो कोळिवाडो या प्रसिध्द उपहारगृहाला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत कुठलिही जिवितहानी झालेली नसली तर आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. या हॉटेल प्रमाणेच शहरातील अनेक हॉटेल्सने अग्निसुरक्षा केली नसल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
वसई पश्चिमेकडील बाभोळा येथे आमचो कोळिवाडो हे हॉटेल आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक हॉटेलमध्ये आग लागली. हॉटेलमधील कर्मचारी आणि काही ग्राहकांनी लगेच बाहेर धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. पाऊण तासानंतर आग विझविण्यात यश आले. हॉटेलातील सिलेंडर व्यवस्थित होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. हे हॉटेल प्रशांत शेट्टी आणि अन्य भागीदारांच्या मालकीचे आहे. मुख्य रस्त्यावर हे हॉटेल आहे. भरदुपारी हॉटेलमध्ये आगीच्या ज्वाळांनी पेट घेतल्याने एकच घबराहट पसरली होती. पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वाहतूक थांबवली होती. दुपारची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ग्राहकांना होणार धोका टळला असं म्हणावं लागेल.