खामगाव येथील आठवडी बाजारात आग! भाजीपाल्याची नऊ दुकाने जळून खाक
By अनिल गवई | Published: October 28, 2022 09:31 AM2022-10-28T09:31:30+5:302022-10-28T09:32:20+5:30
शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार असून या बाजारात भाजीपाला साठवणूक गोदाम आहेत. यापैकी नऊ गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील आठवडी बाजारात मध्यरात्री भाजीपाल्याची दुकाने आणि गोदामांना भीषण आग लागली. या घटनेत बाजारातील नऊ दुकाने आगीच्या भक्ष स्थानी सापडली. बाजारात बाजारात आग लागल्याचे समजतात स्थानिक नागरिकांनी खामगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. सोबतच शेगाव येथील अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.
शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार असून या बाजारात भाजीपाला साठवणूक गोदाम आहेत. यापैकी नऊ गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडली. फटाके फोडताना चिंनगी उडाल्याने ही आग लागल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. किती मिळतात खामगाव येथील अग्निशमन दलाचे जवान तात्काळ बोंबासह दाखल झाले मात्र आगे ची व्याप्ती ही अधिक असल्यामुळे शेगाव येथील अग्निशामन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री एक वाजताच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी शुक्रवारी पहाटेपर्यंत प्रयत्न करण्यात आले. या आगीत एकापाठोपाठ एक अशी एका ओळीतील नऊ दुकाने जळून खाक झाल्याने गोदाम मालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आगीमुळे प्रचंड धूर खामगाव शहर आणि परिसरात पसरला. तर आग लागलेल्या परिसरातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.